शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

घटत्या उत्पादनाने भुईमुगाचा दर भिडला गगनाला

By admin | Updated: November 27, 2015 00:06 IST

गरिबांचा काजू झाला महाग : दर क्विंटलला पाच हजारांवर; पीक घेण्याकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

अशोक खाडे--कुंभोज -दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या बागायती शेतीतील ऊस, केळी पिकांचे क्षेत्र विस्तारत आहे. तसेच वर्षभर घेतल्या जाणाऱ्या भाजीपालादी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, अनियमित पावसाळा तसेच घटत्या उत्पन्नामुळे फायद्या-तोट्याचा विचार करता भुईमूग पीक घेण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. भुईमुगाचा दर क्विंटलला पाच हजारांवर गेल्याने घराघरांत प्रतिवर्षी थोड्याफार साठवणीत असणाऱ्या भुईमुगाच्या शेंगा केवळ आता स्वयंपाकापुरत्याच उरल्याने गरिबांचा काजू जणू महाग झाला आहे.पूर्वी पाहुण्यांचा पाहुणचार चहाऐवजी गूळ-शेंगांनी केला जायचा. मुबलक भुईमूग उत्पादन असताना शेतकरी, शेतमजूर यांच्या घरी भुईमुगाच्या शेंगांचा सुकाळ असे. सर्वसामान्यही स्वयंपाकासह शेंगा भाजून खाण्याबरोबरच बियाणे, तसेच पै-पाहुण्यांना मुक्तहस्ते देत. दीपावली सणासाठी लागणाऱ्या खाद्यतेलाची भुईमुगाचा घाणा काढून गरज भागविली जाई. तथापि, अलीकडील दहा वर्षांत भूईमुगाच्या उत्पन्नात कमालीची घट होत आहे. लहान शेतकरी तर स्वत:च्या गरजेइतकेच भुईमुगाचे पीक घेत आहे, तर मोठ्या शेतकऱ्याने फायद्या-तोट्याचा विचार करून भुईमुगाचे उत्पादनक्षेत्र जाणीवपूर्वक कमी करीत आणल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. परिणामी प्रतिवर्षी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून भुईमुगाची होणारी आवक कमालीची घटली आहे. या कारणास्तव भुईमुगाचे दर वर्षानुवर्षे वाढत आहेत.प्रतिक्विंटलला सहा हजार रुपयांवर जाऊन पोहोचलेला दर गुजरातमधील शेंगांची आवक झाल्याने पाच हजार रुपयांवर आला असला तरी तो आणखी वाढण्याची शक्यता व्यापारी वर्तवीत आहेत. सर्वसामान्यांबरोबरच शेतकऱ्यांसाठीही घरी खाण्यासाठी महागड्या दराने भुईमुगाच्या शेंगा खरेदी करणे अशक्य बनले आहे. त्यामुळे पूर्वापार खासकरून गरिबांचा काजू समजल्या जाणाऱ्या भुईमुगाच्या शेंगदाण्याचा वापर केवळ स्वयंपाकापुरताच होऊ लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.भुईमुगाबरोबरच कडधान्याचे वर्षानुवर्षे घटत चाललेले उत्पादन पाहता कृषी विभागाने भुईमूग व कडधान्याच्या सुधारित जाती विकसित कराव्यात. तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून शेतकऱ्यांना ठरावीक पीक निश्चित क्षेत्रावर घेण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.- अरुण पाटील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, पेठवडगाव. वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या सौद्यादरम्यान भुईमूग शेंगास क्विंटलला नऊ हजार रुपये इतका विक्रमी दर निघाला, तर शेंगांचा सरासरी दर पाच हजार रुपयांवर पोहोचल्याने सर्वसामान्यांसाठी घरात खाण्यासाठी भुईमूग खरेदी करणे आवाक्याबाहेरचे बनले आहे.- प्रवीण देसाई, अडत दुकानदार, मिणचे.