शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

शिवाजी विद्यापीठाकडून ‘दूरस्थ’बाबत अटींच्या पूर्ततेची कार्यवाही : देवानंद शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 10:51 AM

शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण केंद्रातील विविध अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) विविध अटींच्या पूर्ततेची कार्यवाही सुरू आहे. या अभ्यासक्रमांना निश्चितपणे मान्यता मिळेल, असे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले.

ठळक मुद्दे‘दूरस्थ’बाबत अटींच्या पूर्ततेची कार्यवाही : देवानंद शिंदेशिवाजी विद्यापीठाकडून जुलैमध्ये सादरीकरण

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण केंद्रातील विविध अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) विविध अटींच्या पूर्ततेची कार्यवाही सुरू आहे. या अभ्यासक्रमांना निश्चितपणे मान्यता मिळेल, असे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले.युजीसीच्या डिस्टन्स एज्युकेशन ब्युरोने विविध ३५ विद्यापीठांच्या दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमांची मान्यता रद्द केली. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचा समावेश आहे. याबाबत कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, युजीसीने काही नवीन बदल केले आहेत. त्यानुसार दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी विविध अटींची पूर्तता करावी लागत आहे. त्यामध्ये शैक्षणिक साहित्य, काही पदांची भरती, आदींचा समावेश आहे.

अभ्यासक्रमनिहाय विविध अटी आहेत. त्यासह काही त्रुटींची देखील युजीसीकडून माहिती दिली जाते. या अटी आणि त्रुटींची पूर्तता होईल, त्या पद्धतीने अभ्यासक्रमांना मान्यता मिळणार आहे. या अंतर्गत यावर्षी विद्यापीठाला बी. ए. भाग एक अभ्यासक्रमासाठी मान्यता मिळाली आहे. उर्वरित अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठीचा प्रस्ताव विद्यापीठाने सादर केला आहे. त्यानुसार संबंधित अभ्यासक्रमांना मान्यता मिळेल.

दरम्यान, युजीसीने नवी दिल्ली येथे विद्यापीठांची जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये बैठक घेतली. त्यासाठी विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर उपस्थित होते. त्यांनी या बैठकीत विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण केंद्रातील अभ्यासक्रमांबाबतचे सादरीकरण केले. त्यासह अभ्यासक्रमांच्या मान्यतेचा प्रस्तावदेखील सादर केला. त्यातून विद्यापीठाला केवळ बी. ए. भाग एक अभ्यासक्रमासाठी मान्यता मिळाली.

अन्य अभ्यासक्रमांबाबतच्या त्रुटी आणि अटींच्या पूर्ततेबाबतचे पत्र अद्यापही युजीसीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले नाही. ते पत्र उपलब्ध होताच आवश्यक ती कार्यवाही विद्यापीठाकडून केली जाणार आहे.

नोकरी, व्यवसाय करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आधारविद्यापीठातील दूरस्थ शिक्षण केंद्रातर्फे बी. ए., एम. ए. (मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू, अर्धमागधी, जैनालॉजी व प्राकृत, संस्कृत, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, सामान्य प्रशासन), बी. कॉम., एम. कॉम., एम. एस्सी. (गणित), एमबीए, पी. जी. डिप्लोमा इन ट्रान्स्लेशन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो.

नोकरी, व्यवसाय करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठीचा आधार हे दूरस्थ शिक्षण केंद्र आहे. या अभ्यासक्रमांसाठी वर्षागणिक सुमारे २४ हजार विद्यार्थी प्रवेशित होतात. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सोलापूर, गोवा, आदी परिसरातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठuniversityविद्यापीठkolhapurकोल्हापूर