शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पशुचिकित्सालय ‘असून अडचण...’

By admin | Updated: June 23, 2015 00:11 IST

शिरोळ तालुका : प्रथम, द्वितीय श्रेणींतील सहा जागा रिक्त

गणपती कोळी-कुरुंदवाड -शिरोळ तालुका शेतीबरोबर पशुधनातही आघाडीवर आहे. तालुक्यातील राज्य शासनाच्या पशुचिकित्सालय केंद्रातील प्रथम श्रेणीतील दोन व द्वितीय श्रेणीतील सहा जागा रिक्त आहेत. त्यामुळे केवळ चार पशुधन पर्यवेक्षक व तीन पशुधन विकास अधिकाऱ्यांवरून पशुचिकित्सालयाची सेवा सुरू असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर पशुचिकित्सा सेवा मिळेनासे झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत असून, पर्यवेक्षक, अधिकारीविना पशुचिकित्सालय ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशीच झाली आहे.तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या चारही नद्यांमुळे शेतीचा विकास झाला. शेतकरी शेतीबरोबर जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळला. जागोजागी दूध संकलन करणाऱ्या पशुधनालाही प्राधान्य दिल्याने तालुक्यात पशुधनाची संख्या सुमारे लाखापर्यंत आहे. त्यामध्ये गाय आणि म्हशींचीच संख्या अधिक आहे.तालुक्यातील पशुधन सेवा देण्यासाठी तसेच लाळ खुरकत, कृत्रिम रेतन, विविध आजार हटविण्यासाठी लसीकरण मोहीम पशुचिकित्सालय दवाखान्यातून केली जाते. यासाठी राज्य शासनाचे प्रथम श्रेणीतील पाच, तर द्वितीय श्रेणीतील दहा दवाखाने आहेत. द्वितीय श्रेणी दवाखान्यातून पशुधन पर्यवेक्षक काम करीत असून, दहा केंद्रांतर्गत २५ गावे येतात. मात्र, यापैकी सहा केंद्रांतील पर्यवेक्षक पद रिक्त असून, केवळ चार पर्यवेक्षकावरच २५ गावे सांभाळत आहेत. तसेच प्रथम श्रेणीतील पाचपैकी दोन जागा रिक्त असून, तीन पशुधन विकास अधिकारी काम पाहत आहेत. डॉक्टरांअभावी पशुचिकित्सालये ओस पडली असून, शेतकऱ्यांना ही सेवा वेळेवर मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही सेवाच मिळत नसल्याने गावातील पशुचिकित्सालये काय कामाची असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत असल्याने गावातील पशुचिकित्सालये ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशीच झाली आहेत. त्यामुळे तालुक्यातील या ज्वलंत प्रश्नाकडे या विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून पशुसेवा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.तालुक्यातील रिक्त जागेबाबत वरिष्ठांना प्रत्येक महिन्याला अहवाल पाठविला जातो. मात्र, शासनाकडून अद्याप भरती केली नसल्याने पशुधन पर्यवेक्षक व पशुधन विकास अधिकारी पदे रिक्त आहे. उपलब्ध अधिकारी व पर्यवेक्षकांकडून पशुसेवा दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सेवा वेळेवर मिळण्यास अडचण होत आहे. रिक्त पदे भरण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न चालू आहेत. - वाय. बी. पुजारी, सहायक आयुक्त,पशुसंवर्धन अधिकारी, जयसिंगपूर.