कैद्याने कारागृह अधीक्षकावरच केला हल्ला, कोल्हापुरातील कळंबा कारागृहातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 18:46 IST2022-04-27T12:15:36+5:302022-04-27T18:46:06+5:30
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कारागृह अधीक्षक किरकोळ जखमी झाले.

कैद्याने कारागृह अधीक्षकावरच केला हल्ला, कोल्हापुरातील कळंबा कारागृहातील घटना
कोल्हापूर : कोल्हापुरातील कळंबा कारागृहात कैद्याने कारागृह अधीक्षकावरच हल्ला केल्याची घटना घडली. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कारागृह अधीक्षक किरकोळ जखमी झाले. हल्ल्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर कारागृहात एकच खळबळ उडाली. ही घटना बरंक तपासणीवेळी घडली आहे.
रत्नागिरीहून कळंबा कारागृह आणलेल्या कैद्याने कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांच्यावर हल्ला केला. आज, बुधवारी सकाळी ते बरंक तपासणीसाठी गेले असता हा प्रकार घडला. त्यांच्या हाताला दुखापत झाली असून कळंबा कारागृहातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कारागृह अधीक्षक इंदुरकर हे सकाळी नेहमीप्रमाणे बंकर तपासणीला गेले होते, यावेळी दबा धरून बसलेल्या या कायद्याने पत्र्याच्या तुकड्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांची सुटका केली. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे कारागृह अधीक्षक इंदुरकर यांनी सांगितले.