कोयता हल्ल्यात कारागृह कर्मचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:31 IST2021-06-09T04:31:23+5:302021-06-09T04:31:23+5:30

कोल्हापूर : किरकोळ कारणांवरून कळंबा कारागृहातील कर्मचाऱ्यावर एकाने कोयत्याने हल्ला करून त्यांना जखमी केले. ही घटना सोमवारी सकाळी ...

Prison staff injured in coyote attack | कोयता हल्ल्यात कारागृह कर्मचारी जखमी

कोयता हल्ल्यात कारागृह कर्मचारी जखमी

कोल्हापूर : किरकोळ कारणांवरून कळंबा कारागृहातील कर्मचाऱ्यावर एकाने कोयत्याने हल्ला करून त्यांना जखमी केले. ही घटना सोमवारी सकाळी कळंबा जेल समोरील क्वॉटर्समध्ये घडली. अनिल तुकाराम लोहार (वय ४८ रा. कळंबा जेल क्वॉटर्स, कोल्हापूर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी सूरज अनिल पवार (रा. कळंबा जेल क्वाॅटर्स, कळंबा, कोल्हापूर) याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कळंबा जेलमधील कर्मचाऱ्यांचे क्वॉटर्स जेलसमोर आहे. सोमवारी सकाळी अनिल लोहार हे आपल्या पत्नीसोबत बाजार आणण्यासाठी जात होते. त्यावेळी सूरज पवार याने त्यांना रस्त्यात आडवून, तुम्ही शहाणे झालात काय, तुम्हाला लई मस्ती आली आहे, तुम्ही क्वाॅटर्समधील मुलांना माझ्याविषयी वाईट सांगता असे म्हणून त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने लोहार यांच्या अंगावर धावून जाऊन हातातील कोयत्याने डोक्यात मारून जखमी केले. याबाबत लोहार यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सूरज पवार याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Prison staff injured in coyote attack