शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांची धावाधाव

By admin | Updated: May 27, 2015 00:59 IST

सोई सवलती देण्याची तयारी : पटसंख्या टिकविण्यासाठी विद्यार्थी शोध सुरू

घन:शाम कुंभार - यड्राव -ग्रामीण भागातील पालकांचा कल खासगी शाळेत मुलांना पाठविण्याकडे असल्याने जिल्हा परिषदांच्या शाळांना विद्यार्थी पटसंख्या कमी पडत आहे; तर पटाअभावी बदलीची जोखीम शिक्षकांवर आल्याने नव्या विद्यार्थ्यांना स्वखर्चाने सोई सवलती देण्याची तयारी शिक्षकांनी केली असली तरी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शाळेची गुणवैशिष्ट्ये व गुणवत्ता असलेले डिजिटल फलक शाळेच्या भिंतीवर लागले आहेत.खासगी शाळा, तेथील आकर्षक परिसर, गणवेश, घरापासून शाळेपर्यंत व शाळेपासून घरापर्यंत असणारी बससेवा, इंग्रजी माध्यमाचे शिक्षण यासह शेजारचा मुलगा अशा शाळेत जातो म्हटल्यावर आपले पाल्य तिथे शिक्षण घ्यावी, ही भावना ग्रामीण भागासह सर्वत्र रूढ होत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांसह पालकही याकडे आकर्षिक होत आहेत.याचा परिणाम शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या घटण्यामध्ये होत आहे. जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या कमी झाली, तर सध्या ज्या शाळेत शिक्षण देण्याचे काम शिक्षकांकडून होते, तेथील शिक्षक संख्या नियमाप्रमाणे कमी होईल व त्यांना अन्यत्र जावे लागेल.नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास महिनाभर अवधी असला तरी शिक्षकमंडळी सुटीचा आनंद घेण्याऐवजी नवे विद्यार्थी शोधण्याची मोहीम सुरू करून त्यांच्या पालकांना आपल्या शाळांचे महत्त्व व वैशिष्ट्ये पटवून देत आहेत; तर शहर परिसरातील खासगी शाळांसह, जिल्हा परिषद शाळा, हायस्कूलकडून आपल्या संस्थेची गुणवत्ता, सांस्कृतिक वैशिष्ट्ये, विविध स्पर्धांतील यशस्वीतांचे फोटो व सेवा-सुविधांची माहिती असणारे डिजिटल फलक आपापल्या इमारतींवर झळकवले जात आहेत. यामुळे विद्यार्थी व पालकांना आकर्षित करण्यासाठी खासगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मात्र धावाधाव करावी लागत आहे. पटसंख्या टिकविण्यासाठी त्यांना विद्यार्थ्यांचा शोध घ्यावा लागत असून, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी तयार करण्यासाठी शिक्षकांना परीक्षा द्यावी लागत आहे.विविध सोयींची सवलतशाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढावी, नवे विद्यार्थी आपल्या शाळेकडे कसे आकर्षित होतील, याकरिता शिक्षकांनी संयुक्तपणे स्वजबाबदारीवर विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण, आकर्षक गणवेशासाठी प्रयत्न, बैठकीसाठी बेंचेसची देणगीद्वारे उपलब्धता, जादा अंतरावरील विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी वाहनाची सोय, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहनाबरोबरच त्यांच्यावर आर्थिक बोजा पडू नये, याचीही खबरदारी घेतली जात आहे.