प्राथमिक शिक्षक बॅंकेला २ कोटी ६० लाखांचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST2021-04-03T04:21:37+5:302021-04-03T04:21:37+5:30

कोल्हापूर : या आर्थिक वर्षात प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेला २ कोटी ६० लाख ७२ हजारांचा नफा झाला आहे, अशी ...

Primary Teachers Bank makes a profit of Rs 26 million | प्राथमिक शिक्षक बॅंकेला २ कोटी ६० लाखांचा नफा

प्राथमिक शिक्षक बॅंकेला २ कोटी ६० लाखांचा नफा

कोल्हापूर : या आर्थिक वर्षात प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेला २ कोटी ६० लाख ७२ हजारांचा नफा झाला आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष प्रशांतकुमार पोतदार यांनी दिली.

जिल्ह्यात महापूर, कोरोना या पाठोपाठ आलेल्या आपत्तींमुळे व्यवहार बंदी, जागतिक मंदी या सर्व कठीण काळातही संचालक, सभासद, ठेवीदार, कर्जदार, सेवक वर्ग यांच्या सहकार्यामुळे ६०० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा बॅंकेने पार केला आहे. आरटीजीएस, एनईएफटीसारख्या सुविधा उपलब्ध करुन दिल्याने ग्राहकांची चांगली सोय झाली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानुसार सर्व तरतुदी करण्यात आल्या आहेत.

बॅंकेच्या ११ शाखांमधून ग्राहकांना सुविधा पुरवल्या जात आहेत, त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष पोतदार यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष अरुण पाटील, संचालक नामदेव रेपे, जी. एस. पाटील, राजमोहन पाटील, बजरंग लगारे, संभाजी बापट, शिवाजी पाटील, साहेब शेख, दिलीप पाटील, आण्णासो शिरगावे, प्रसाद पाटील, डी. जी. पाटील, बाजीराव कांबळे, सुरेश कोळी, स्मिता डिग्रजे, लक्ष्मी पाटील, संदीप पाटील, सुमन पोवार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी, अकौंटंट राजेंद्र चौगुले उपस्थित होते.

Web Title: Primary Teachers Bank makes a profit of Rs 26 million