शित्तूर-वारुण परिसरात वळवाच्या पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:19 IST2021-05-03T04:19:53+5:302021-05-03T04:19:53+5:30

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात पावसाचे केवळ वातावरण होत होते. मात्र, पाऊस काही पडत नव्हता. आज मात्र सकाळपासूनच वातावरणात ...

Presence of torrential rains in Shittur-Varun area | शित्तूर-वारुण परिसरात वळवाच्या पावसाची हजेरी

शित्तूर-वारुण परिसरात वळवाच्या पावसाची हजेरी

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात पावसाचे केवळ वातावरण होत होते. मात्र, पाऊस काही पडत नव्हता. आज मात्र सकाळपासूनच वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत होता. अंगाची लाहीलाही होत होती. दुपारी तीनच्या सुमारास वळवाच्या पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. पाऊस थांबल्यानंतरही ढगांचा गडगडाट सुरूच होता. पावसामुळे शेतकरी सुखावला असून, वाढत्या उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

Web Title: Presence of torrential rains in Shittur-Varun area