शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आयजीएम रूग्णालय हस्तांतराचा प्रस्ताव तयार

By admin | Updated: October 19, 2015 00:14 IST

२५३ पदे पुनर्जीवित होणार : मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हिवाळी अधिवेशनात अंतिम मंजुरी

इचलकरंजी : येथील नगरपालिकेचे आयजीएम रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयाकडून तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावावर आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येऊन त्याला विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात अंतिम मंजुरी देण्यात येईल. यामुळे दवाखान्याकडे पूर्वी असणारी २५३ पदे पुनर्जीवित होण्याची अपेक्षा आहे.आयजीएम रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका सुनावणीच्या प्रक्रियेत आहे. न्यायालयातील सुनावणी दरम्यान, ‘आयजीएम’बाबत नगरपालिकेने धोरणात्मक निर्णय घ्यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्याबाबत ८ आॅक्टोबरला झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आयजीएम रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करावे, असा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. या विषयास अनुसरून १३ आॅक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ‘आयजीएम’ शासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी दिला होता.या विषयास अनुसरून शनिवारी मुंबई येथील आरोग्य मंत्रालयात सचिव मनीषा म्हैसकर, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, ‘आयजीएम’चे आरोग्य अधीक्षक डॉ. श्रीकांत सूर्यवंशी, कामगार अधिकारी विजय राजापुरे, आदींची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये आयजीएम रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करण्याविषयी सविस्तर अहवाल तयार करण्यात आला. सध्या रुग्णालयाकडे २३९ कर्मचारी असून, यापैकी तांत्रिक अधिकारी व कर्मचारी शासनाकडे वर्ग होतील. बाकी कार्यालयीन कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर शासन किंवा नगरपालिका असा विकल्प राहील. हा प्रस्ताव साधारणत: एक महिन्याभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येईल. या बैठकीत मंजूर झाल्यानंतर तो विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सादर करण्यात येईल. अधिवेशनामध्ये अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर शासनाकडे वर्ग करण्याविषयी प्रक्रिया सुरू होईल.तांत्रिक कर्मचारी शासकीय सेवेतरुग्णालयाकडील डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, कंपाउंडर, क्ष-किरण तज्ज्ञ, आदी तांत्रिक अधिकारी व कर्मचारी शासकीय सेवेमध्ये वर्ग होतील. मात्र, कार्यालयीन कामकाज पाहणारे लिपिक, शिपाई, सफाई कर्मचारी, आदींनी शासकीय सेवेत किंवा नगरपालिका सेवेत राहण्याचा त्यांच्यासमोर विकल्प राहील.