शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine-लसीकरणाची तयारी पूर्ण, कोव्हिड व्हॅक्सीन लस कोल्हापूर जिल्ह्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 17:18 IST

Corona vaccine Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात शनिवार दि. 16 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी 37 हजार 580 कोव्हिड व्हॅक्सीन आज जिल्ह्यात दाखल झाले. याबाबत लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असून महापालिका क्षेत्रात 6 आणि जिल्ह्यातील 8 केंद्रांवर याचा प्रारंभ शनिवारी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.

ठळक मुद्देकोव्हिड व्हॅक्सीन लस कोल्हापूर जिल्ह्यात दाखलशनिवारी होणाऱ्या लसीकरणाची तयारी पूर्ण : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर: जिल्ह्यात शनिवार दि. 16 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी 37 हजार 580 कोव्हिड व्हॅक्सीन आज जिल्ह्यात दाखल झाले. याबाबत लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असून महापालिका क्षेत्रात 6 आणि जिल्ह्यातील 8 केंद्रांवर याचा प्रारंभ शनिवारी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.       कोव्हिड-19 लसीकरणाच्या नियोजन मोहिमेचा शुभारंभ शनिवारी होणार असून या अनुषंगाने मोहिमेचे नियोजन व पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी कोव्हिड व्हॅक्सीन लसीकरण मोहीम जिल्हा कृतीदल समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. फारूख देसाई यांनी याबाबत संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली.जिल्हाधिकारी  देसाई यावेळी म्हणाले, या लसीकरण मोहिमेसाठी  सामाजिक संस्था, वैद्यकीय संघटना, खासगी डॉक्टर्स या सर्वांचा सहभाग घ्यावा. त्यासंदर्भात त्या सर्वांची बैठक आयोजित करावी. त्यामध्ये धर्मगुरूंनाही निमंत्रित करावे. शनिवारी सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी सर्व लोकप्रतिनिधींना नजिकच्या केंद्रांवर शुभारंभ प्रसंगी निमंत्रित करावे.

या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक आदी उपस्थित होते.

एकूण 14 केंद्रांवर लसीकरण

महापालिका क्षेत्रात 6 आणि जिल्ह्यातील 8 केंद्रांवर अशा एकूण 14 केंद्रांवर प्रत्येक केंद्रांवर 100 लाभार्थीप्रमाणे लसीकरण करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, वैद्यकीय व्यावसायिक संघटना यांच्या समन्वयातून लसीकरण मोहीम यशस्वी करावी.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर