शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

प्रयाग चिखलीच्या तरुणाचा मानोली धबधब्यात बुडून मृत्यू

By admin | Updated: August 18, 2015 01:01 IST

दगडाच्या फटीत अडकून ठार

आंबा : मानोली धबधब्याच्या डोहात पोहताना इम्रान दस्तगीर अत्तार (वय २७, रा. शाहूवाले मळा, प्रयाग चिखली) हा दगडाच्या फटीत अडकून ठार झाला. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने धरण व धबधबा परिसर सुना झाला. आस्कमिक घडलेल्या या अपघातामुळे सोबतचे पाच मित्र भांबावून गेले. धबधब्याच्या गर्दीत इम्रान दिसेनासा होताच त्यांनी मदतीची हाक दिली. मानोलीच्या तरुणांनी पाईपच्या साहायाने शोध घेऊन अर्ध्या तासात मृतदेह डोहाबाहेर काढला व मित्रांनी शाहूवाडी पोलिसांत धाव घेतली. याबाबतची अधिक माहिती अशी, अत्तार ओमनी मारुतीने सकाळी गल्लीतील पाच मित्रांसोबत पावनखिंडमार्गे विशाळगडला देव दर्शनास गेले होते. तेथे प्रसाद घेऊन आंबामार्गे परतताना मानोली धरणाजवळच्या धबधब्यात अंघोळीस उतरले. अंघोळ करून जेवायचे, असे ठरवून इम्रान धबधब्याखाली गेला. डोहात सूळ मारताच डोहाच्या दगडात डोके अडकून बुडून तो ठार झाला. धबधब्याखाली वीस फुटांवर डोह आहे. वरून डोह वीस फूट घेराचा असला, तरी पाण्यात निमुळता घेर आहे. दगड-चरींमुळे डोहात उतरणे धोक्याचे असताना तरुणाईचा अतिउत्साह जिवावार बेतणारा ठरला. सोळा वर्षांत येथील हा पहिलाच दुर्दैवी अपघात आहे. गावावर पसरली शोककळा इम्रानचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. त्याला एक वर्षाची मुलगी आहे. त्याचा धाकटा भाऊ अनिसचा सहा वर्षांपूर्वी चिकली-प्रयाग येथे पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील असा परिवार आहे. आंबवडे फाट्यावर त्याचे एस. एम. बॅटरीचे दुकान आहे. त्याच्या मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे. (वार्ताहर)