Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका, पोलिस संरक्षणात बाहेर काढले -video

By सचिन यादव | Updated: April 11, 2025 14:46 IST2025-04-11T14:45:17+5:302025-04-11T14:46:56+5:30

कोल्हापूर : राष्ट्रपुरुषांचा अवमान करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा प्रशांत मुरलीधर कोरटकर (रा. नागपूर ) याची ...

Prashant Koratkar released from Kalamba jail police tight security | Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका, पोलिस संरक्षणात बाहेर काढले -video

Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका, पोलिस संरक्षणात बाहेर काढले -video

कोल्हापूर : राष्ट्रपुरुषांचा अवमान करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा प्रशांत मुरलीधर कोरटकर (रा.नागपूर) याची कळंबा कारागृहातून सुटका झाली. न्यायालयाने अटी-शर्तींसह ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कोरटकरचा जामीन मंजूर केला होता. मात्र कागदपत्रांची पुर्तता न झाल्याने त्याचा कारागृहातील दोन दिवस मुक्काम वाढला होता. अखेर कडक पोलिस बंदोबस्तात कोरटकरला कारागृहातून बाहेर आणण्यात आले. यावेळी कारागृह परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दुपारी २.१५ मिनिटांनी कोरटकरला कारागृहातील अंडासेल मधून बाहेर काढले. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्याला पोलिसाच्या स्वाधीन केले अशी माहिती कारागृहातील वरिष्ठ अधीक्षक नागनाथ सावंत यांनी दिली.

न्यायालयाने कोरटकरला बुधवारी (दि.९) जामीन मंजूर केला होता. मात्र, जामिनाचे पत्र कळंबा कारागृहात पोहोचू शकले नव्हते, त्यामुळे त्याची सुटका होऊ शकली नव्हती. कागदपत्रांची पूर्तता होताच आज, शुक्रवारी सुटका झाली. सुनावणीवेळी कोरटकरवर न्यायालय परिसरात हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे कडक पोलिस बंदोबस्तात त्याला कारागृहातून बाहेर काढले.

कोरटकर याने २५ फेब्रुवारीच्या रात्री इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. यानंतर तो फरार झाला होता. त्याला २५ मार्च रोजी अटक झाली. पाच दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. त्यानंतर, त्याने वकिलांमार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, सरकारी वकील आणि फिर्यादींच्या वकिलांनी केलेल्या जोरदार युक्तिवादामुळे कोरटकरचा कोठडीतील मुक्काम वाढला होता. अखेर बुधवारी न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला.

अटींचे पालन करण्याच्या सूचना  

फिर्यादी आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव आणू नये. पुरावे नष्ट करू नयेत. चौकशीत पोलिसांना सहकार्य करावे. पोलिसांच्या परवानगीशिवाय बाहेरगावी जाऊ नये, अशा अटींचे पालन करण्याच्या सूचना त्याला न्यायाधीशांनी दिल्या आहेत.

Web Title: Prashant Koratkar released from Kalamba jail police tight security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.