शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

‘पेर्इंग घोस्ट’, गोष्ट कुटुंबवत्सल भुतांची

By admin | Updated: May 27, 2015 00:58 IST

कलाकारांशी गप्पाटप्पा : सखींच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे

कोल्हापूर : एरव्ही भूत म्हटले तरी आपल्यासमोर तारे चमकतात; पण आमच्या चित्रपटातील सगळी भुते कुटुंबवत्सल आहेत. माधव माटेगावकर या तरुणाचे आयुष्य अधिक सुंदर करणारी आहेत. भुतं आणि माणसाच्या भावनिक नात्याची गोष्ट सांगणारा ‘अ पेर्इंग घोस्ट’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी (दि. २९) प्रदर्शित होत आहे... अशा शब्दांत या चित्रपटाच्या कलाकारांनी ‘लोकमत सखी मंच’च्या सदस्यांशी संवाद साधला. शाहू स्मारक भवनमध्ये मंगळवारी आयोजित या मुक्त संवादाचे उद्घाटन रोपाला पाणी घालून झाले. व्यासपीठावर ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, अभिनेत्री स्पृहा जोशी, शर्वानी पिल्ले, अनिता दाते, अभिनेता उमेश कामत, पुष्कर श्रोत्री, कांचन पगारे, समीर चौगुले उपस्थित होते. स्पृहा जोशी म्हणाल्या, व. पु. काळे यांच्या ‘बदली’ या कथेवर आधारित हा चित्रपट एक प्रेमकथा आहे, ज्याला भुतांचा तडका आहे. उमेश कामत म्हणाले, माधव माटेगावकर या अत्यंत साध्या, सरळमार्गी असलेल्या मुलाला अनेक लोक छळत असतात. अशा परिस्थितीत भुतांचे कुटुंब त्याच्या मदतीला धावून येते. पुष्कर श्रोत्री व शर्वानी पिल्ले म्हणाल्या, आम्ही दोघं आणि सहा लहान मुली अशा भुतांची भूमिका साकारत आहोत, जी अतिशय कुटुंबवत्सल आहेत, संवेदनशील आहेत. भूत आणि माणसांचे नाते प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. कांचन पगारे, समीर चौगुले व अनिता दाते यांनीही चित्रपटाबद्दल माहिती सांगितली. यावेळी स्पृहा जोशी यांनी ‘आनंदाला माझ्या आहे मर्यादेचं पांघरूण’ ही कविता सादर केली. त्यानंतर कलाकारांनी सखींनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली. तत्पूर्वी सखींनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. स्नेहा सारडा ‘बॉलिवूड ब्युटी...’सखी सदस्यांसाठी ‘बॉलिवूड ब्युटी’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात सखींनी हेमामालिनीपासून जया भादुरी, प्रियांका चोप्रा, म्हाळसादेवी अशा विविध वेशभूषा साकारल्या. या स्पर्धेत स्नेहा सारडा यांनी प्रथम क्रमांक पटकावला. वनिता बक्षी व अमरजा नाझरे यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकांचे पारितोषिक देण्यात आले. परीक्षक म्हणून मनीषा रानमाळे यांनी काम पाहिले.