दत्तवाड येथील व्यासपीठाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:30 IST2021-09-10T04:30:20+5:302021-09-10T04:30:20+5:30

दत्तवाड, ता. शिरोळ येथील जुन्या ग्रामपंचायतीसमोर विविध कार्यक्रमाच्या आयोजनासाठी व्यासपीठ तयार करण्यात आले. यापूर्वी गांधी चौकात बाजार कट्टा ...

Poor condition of the platform at Dattawad | दत्तवाड येथील व्यासपीठाची दुरवस्था

दत्तवाड येथील व्यासपीठाची दुरवस्था

दत्तवाड, ता. शिरोळ येथील जुन्या ग्रामपंचायतीसमोर विविध कार्यक्रमाच्या आयोजनासाठी व्यासपीठ तयार करण्यात आले. यापूर्वी गांधी चौकात बाजार कट्टा होता. तेथे सभा होत होत्या. मात्र, ग्रामपंचायतीने बाजार कट्टा काढून तेथे व्यावसायिक दुकानगाळे बांधले. तेथील काढलेल्या दगडाचा वापर करून जुन्या ग्रामपंचायतीसमोर व्यासपीठाचा कट्टा बांधण्यात आला. या व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, निळू फुले, दादा कोंडके, एन. डी. पाटील, लक्ष्मण वडले यांच्यासह अनेक मान्यवरांची भाषणे झाली आहेत, तर ग्रामपंचायत निवडणूकपासून लोकसभेच्या निवडणुकीच्या सभा येथे झाल्या आहेत. गावातील विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमाचा हा व्यासपीठ साक्षीदार आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीने जुनी ग्रामपंचायत बंद करून गांधी चौकात व्यावसायिक गाळ्यावर बांधकाम करून तेथे ग्रामपंचायत स्थलांतरित केली व पुढील चौकात पश्चिम बाजूला नवीन व्यासपीठ उभा गेले. त्यामुळे जुन्या ग्रामपंचायतीसमोरील व्यासपीठावरील कार्यक्रम बंद झाले व व्यासपीठाची दुरवस्था सुरू झाली. यामुळे दतवाडच्या विविध सामाजिक, राजकीय चळवळीचा साक्षीदार असणाऱ्या व्यासपीठाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

फोटो--दत्तवाड येथे जुन्या ग्रामपंचायतच्यासमोरील दुरवस्था झालेले व्यासपीठ. ( फोटो- मिलिंद देशपांडे दत्तवाड)

Web Title: Poor condition of the platform at Dattawad