शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणप्रश्नी अद्याप कारवाई शून्य

By admin | Updated: January 19, 2015 00:49 IST

पंचगंगा प्रदूषण : तीव्र आंदोलनानंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळ सुस्तच; आरोग्याचा प्रश्न गंभीर

गणपती कोळी - कुरुंदवाड\पंचगंगा नदी प्रदूषणामुळे नदीतील मासे मृत होत असल्याने शुक्रवारी स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. आंदोलन झाले, अधिकाऱ्यांनी पंचनामा केला, आश्वासने दिली, दूषित पाणी वाहून जाण्यासाठी बंधाऱ्याचे बरगे काढण्याचाही निर्णय झाला; मात्र दोन दिवस उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई नाही. माशांचे मरण मात्र अद्यापही चालूच आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय माशांवर उदरनिर्वाह करणाऱ्या बागडी समाजावरही उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे आंदोलकर्त्यांनी तीव्र आंदोलन करूनही अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर कोणताही परिणाम न झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून, पंचगंगा प्रदूषण प्रश्न आणखी पेटण्याची शक्यता आहे.पंचगंगा नदीवरील शिरोळचा बंधारा शेवटचा असला तरी तेरवाड बंधाऱ्यावर पाणी तटवून तालुक्यातील बहुतांश गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या नदीमध्ये धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झाला असल्याने रूई, चंदूर, कबनूर, इचलकरंजी शहरांतील सांडपाण्याबरोबर औद्योगिकरणाचे पाणी नदीत सोडले जात असल्याने पाणी काळेकुट्ट झाले आहे. पाण्याला उग्र वास येत असून, पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने पाणी स्वच्छ करणारे जलचर प्राणी (मासे) तडफडून मृत होत आहेत. तेरवाड बंधाऱ्याला तटून पाण्यामध्ये माशांचा थर लागल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बंडू पाटील (हेरवाड), विश्वास बालिघाटे (शिरढोण), महेश पाटील (सैनिक टाकळी) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत नदी प्रदूषणाला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी शंकर केंदुळे यांना जबाबदार धरत त्यांना मृत माशांचा हार घालत दूषित पाणी पाजण्याचा प्रयत्न करीत आपल्या भावना तीव्र केल्या. अद्यापही दूषित पाण्याचा प्रवाह नदीत चालू असल्याने मासे मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे नदीकाठी उग्र वास येत असून, तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच तेरवाड बंधाऱ्यावर तालुक्यातील बागडी समाज मच्छिमारी करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, मासेच मृत होत असल्याने या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. आंदोलनकर्त्यांनी आंदोलन तीव्र करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. मात्र, याचे गांभीर्य प्रदूषण नियंत्रण मंडळानी न घेता आपल्या कार्यप्रणालीवर कोणतेही परिणाम न झाल्याचे दाखविल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.