शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-गगनबावडा रस्ता दुरुस्तीचे सर्वेक्षण सुरू

By admin | Updated: November 8, 2014 00:24 IST

‘लोकमत’चा दणका : पाच मीटरचा रस्ता होणार सात मीटरचा

कोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा या महत्त्वाच्या रस्त्याची अक्षरश: चाळण होऊन या राज्यमार्गाला पाणंद रस्त्याचे स्वरूप आले होते. यावर ‘लोकमत’मधून कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याची चाळण अशी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या रस्त्याचा बांधकाम विभागाकडून गेल्या चार दिवसांपासून दुरूस्तीसाठी सर्व्हे झाला असून, या रस्त्याच्या मजबुतीबरोबर रूंदीकरणही होणार आहे.कोल्हापूर-गगनबावडा रस्ता हा तळकोकणात प्रवेश करण्यासाठी खुश्कीचे प्रवेशद्वार आहे. या मार्गावरूनच तळकोकणात गोवा, रत्नागिरी, विजयदुर्ग, खारेपाटणसारख्या पर्यटन केंद्राकडे जाण्यासाठी सर्वांत जवळचा व सुरक्षित मार्ग म्हणून या रस्त्याकडे पाहिले जाते. ५४ कि.मी.च्या या मार्गाला २५० नागमोडी वळणे आहेत. मात्र, शासनाच्या दुर्लक्षाने व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेने या मार्गावर खड्डे पडून अक्षरश: चाळण झाली होती. प्रवासी वाहतूक करणारी वाहने, माल वाहतूक करणारी मोठी वाहने, दुचाकीने प्रवास करणाऱ्यांना कोणता खड्डा चुकवावा, अशी अवस्था निर्माण झाली होती. मात्र, या मार्गावर करण्यात आलेली दुरूस्तीची व पॅचवर्कची कामे निकृष्ट दर्जाची आहेत. याबाबत ‘लोकमत’मधून कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याची चाळण असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत बांधकाम विभागाने गेल्या चार दिवसांपासून कळेपर्यंतच्या मार्गाचे पाच मीटरऐवजी सात मीटर रूंदीकरण व दुरूस्ती सर्व्हे सुरु आहे.- सोयीचा पण कंबरडे मोडणारा /पान ३ वररस्ता दुरुस्तीचा दर्जा सांभाळणे महत्त्वाचेकोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर दरवर्षी लाखो रुपये दुरूस्ती व पॅचवर्किंगसाठी खर्च होतात. मात्र दर्जाहीन कामामुळे गेल्या सहा महिन्यांपूर्वी केलेली कामे उखडून रस्त्याची चाळण झाली आहे. आता होणाऱ्या रस्त्याचा दर्जा राखणे महत्त्वाचे आहे.रस्त्याच्या दुतर्फा असणारे वृक्ष वाचविणे गरजेचे रस्त्याच्या दुतर्फा डेरेदार वृक्ष आहेत. या वृक्षामुळे या रस्त्याला निसर्गाच्या सौंदर्याचे लेणे मिळाले आहे. हे वृक्ष वाचविण्याची गरज आहे.कोल्हापूर ते कोपार्डे दरम्यान असणारे वीट भट्ट्या व बांधकाम अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. ते हटविण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे.