शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

लगाव बत्ती इकडं धूर.. तिकडं जाळ: सख्खे शेजारी

By सचिन जवळकोटे | Updated: August 24, 2025 13:22 IST

दक्षिण महाराष्ट्र म्हणजे एकेकाळी ‘थोरले काका बारामतीकर’ यांचा बालेकिल्ला.

▪️‘एकनाथभाई’ अन् ‘अजितदादा’ यांच्यातील छुपा संघर्ष ‘मीडिया’साठी नेहमीच ‘ब्रेकिंग न्यूज’ देत असलेला. मात्र, दोघेही तसे मूळचे सख्खे शेजारी हे खूप कमी लोकांना माहीत असलेलं.  दाेघेही मूळ एकाच जिल्ह्यातले. साताऱ्याचे. ‘भाई’ हे तापोळा खोऱ्यातील ‘दरे’ गावचे. ‘दादा’ हे हायवे पलीकडील ‘नांदवळ’चे. दोघांच्या गावांतील अंतर तसं खूप कमी. मात्र, राजकीय ईर्ष्या म्हणे वरचेवर वाढतच चाललेली. त्याचाच हा रंजक शोध. लगाव बत्ती..

▪️दक्षिण महाराष्ट्र म्हणजे एकेकाळी ‘थोरले काका बारामतीकर’ यांचा बालेकिल्ला. काळाच्या ओघात यातले बहुतांश बुरूज ‘पुतण्या’ म्हणजे ‘अजितदादां’च्या अखत्यारीत आलेले. यातला काही टापू पूर्वी  ‘ठाकरे’ घराण्याच्याही साम्राज्यातला. तोही पूर्णपणे आता ‘एकनाथभाईं’नी ताब्यात घेतलेला. ‘सातारा’ जिल्हा ‘दादां’साठी, तर ‘कोल्हापूर’ जिल्हा ‘भाईं’साठी हक्काचा ठरलेला. ‘सांगली’त दोन्ही पक्ष अत्यंत कमकुवतच. मात्र, दोन्ही पार्टींच्या बड्या नेत्यांमध्ये एकमेकांचे मतदारसंघ पोखरण्यावर चढाओढ सुरू झालेली. परंपरागत विरोधकांना ताकद देण्याची व्यूहरचना आखली जाऊ लागलेली.

▪️‘कोल्हापूर’चंच बघा ना. करवीर मतदारसंघात ‘नरके’ हे ‘शिंदेसेने’चे आमदार. त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी ‘राहुलदादा’ आजपावेतो ‘हातात हात’ घालून ‘सद्भावना दौड’ काढत होते. इथंपर्यंत ठीक चाललेलं. मात्र, आता त्यांना आपल्या छावणीत घेऊन ‘अजितदादां’नी जणू ‘करवीर’चं राजकारण बदलण्याचा विडाच उचललेला. विशेष म्हणजे ‘दादां’सोबत राहूनही ‘चंद्रदीप’ यांच्याविरोधात मैदानात उतरणार असल्याची घोषणाही ‘पाटलां’नी केलेली. १९९० च्या सुमारास कोल्हापुरातील राजकारणाचं एकत्रित नेतृत्व करणाऱ्या ‘मनपा’चे तिन्ही राजकीय वारसदार आज ‘महायुती’त असले तरी एकमेकांच्या विरोधात दिसू लागलेले. आलं का लक्षात?.. ‘मनपा’ म्हणजे महाडिक, नरके, पाटील. लगाव बत्ती..

▪️दुसरीकडे, ‘मुश्रीफां’च्या मतदारसंघात मध्यंतरी ‘आबिटकारां’नी फोडाफोडीची चाचपणी केलेली. ‘गडहिंग्लज’च्या माजी नगराध्यक्षांसह काही नेत्यांची बंधू ‘अर्जुन’ यांनी गुप्त भेट घेतलेली. हे कळल्यानंतर ‘हसनभाईं’नी तत्काळ पॅचअप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जुन्या-नव्यांचा मेळ अजूनही न बसलेला. अशातच सर्किट बेंच उद्घाटनावेळी कोल्हापूर शहरातील रस्त्यांवर जागोजागी ‘घड्याळ’वाल्यांचे डिजिटल ‘आदिल’नी लावलेले. ‘शिंदेसेना’ नेते ‘क्षीरसागरां’च्या मतदारसंघातच ‘अजितदादां’च्या ‘मुश्रीफां’चे फोटो झळकावेत हा नक्कीच योगायोग नसलेला. लगाव बत्ती..

▪️‘बाणा’च्या टापूत ‘घड्याळा’चे काटे उलटे..‘पाटण’ मतदारसंघात तर सारा उलटाच खेळ. ‘शंभूराज’ यांचे प्रतिस्पर्धी ‘पाटणकर’ यांनी आता ‘कमळ’ घेतलं असलं तरी ‘उंडाळकर’ मात्र ‘घड्याळ’ घेऊन इथल्या राजकारणाचे काटे उलटे फिरवण्याच्या मूडमध्ये असलेले. ‘सुपने-तांबवे, मंद्रुळकाेळे अन् कुंभारगाव’ हे तीन झेडपी मतदारसंघ येतात ‘पाटण विधानसभा’मध्ये. या तिन्ही ठिकाणी ‘उदयसिंहदादा’ यांच्या गटाचं पूर्वीपासून वर्चस्व. आता ‘एकनाथभाईं’च्या लाडक्या मंत्र्याविराेधातील मंडळींना ‘फडणवीस’ अन् ‘अजितदादा’ ताकद देताहेत, हे कशाचं लक्षण? लगाव बत्ती..

▪️आणखी एक योगायोग म्हणजे साताऱ्याचा. ‘एकनाथभाईं’चं ‘दरे’गाव ‘मकरंदआबां’च्या वाई-महाबळेश्वर मतदारसंघात आलेलं. या दोघांचं ‘इंटर्नल ट्युनिंग’ म्हणे खूप चांगलं. ‘तापोळा’ खोऱ्यात कोट्यवधींचा निधी ओतताना ‘भाईं’नी प्रत्येकवेळी ‘आबां’ना जसं विश्वासात घेतलेली, तसंच गेल्या वर्षीच्या आमदारकी निवडणुकीत ‘दरे’ परिसरातली जवळपास सगळीच मतं ‘आबां’नाच पडलेली. मात्र याच ‘बोपेगाव’च्या ‘पाटलांचे नितीनकाका’ कोरेगाव मतदारसंघात घुसू लागलेले. ‘जरंडेश्वर’ कारखान्याला जोडणारे सारे रस्ते चकाचक करण्यात ‘काकां’नी भलताच पुढाकार घेतलेला. आता हा मतदारसंघ ‘शिंदेसेने’च्या ‘महेशदादां’चा, हाही नक्कीच योगायोग नसलेला. लगाव बत्ती..

▪️शेजारच्या ‘सांगली’त ‘भाई’ अन् ‘दादां’च्या नेत्यांना काम करायला प्रचंड संधी (!). भलताच वाव (!).. म्हणजे अवघ्या जिल्ह्यात ‘दादां’चा एकही आमदार नसलेला. नाही म्हणायला ‘भाईं’साठी ‘खानापूर-आटपाडी’मधले ‘सुहास भैय्या’ एकमेव आमदार ठरलेले. जिल्ह्यातील सेनेचा पहिलाच आमदार  म्हणून निवडून येण्याचा मान याच ‘बाबर’ घराण्यानं पटकावलेला. इथंही परंपरागत प्रतिस्पर्धी ‘वैभवदादां’नी ‘अजितदादां’च्या मदतीनं पूर्वी ताकद वाढवण्याचा प्रयत्न केलेला. मात्र, ‘अथांग महासागरातल्या बेटावरचा एकांत’ न परवडणारा म्हणून त्यांनी ‘कमळाच्या लाटेवर स्वार’ होण्याचा निर्णय घेतलेला. लगाव बत्ती..

- सचिन जवळकोटे,कार्यकारी संपादक, लोकमत कोल्हापूर

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारkolhapurकोल्हापूर