शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात काँग्रेस, शिंदे सेना एकत्र येण्याची शक्यता; सतेज पाटलांचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 14:04 IST

कोल्हापूरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण, भाजपा आणि शिंदेसेना एकत्र येत सत्ता स्थापन करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाला. महायुतीला काँग्रेसने कडवी झुंज दिली, या निकालामध्ये महायुतीने ४५ जागा मिळवत बहुमत घेतले. भाजप २६, शिवसेना शिंदे १५, राष्ट्रवादी अजित पवार ४ अशा जागा महायुतीला मिळाल्या तर काँग्रेसला ३४, शिवसेना १ अशा जागा महाविकासआघाडीला मिळाल्या आहेत. आता महापौर पदाची चर्चा सुरू आहेत. महायुतीचा महापौर असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान, आज काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुका आणि महापौरपदाबाबत सूचक विधान केली. 

दरम्यान, कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या सूचक विधानामुळे खळबळ उडाली आहे. 'पडद्यामागे काय सुरू आहे, ते सध्या जाहीर करता येणार नाही', असे म्हणत त्यांनी अधिक तपशील देणे टाळले, पण त्यांच्या या विधानामुळे काँग्रेस आणि शिंदे गट यांच्यात संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू आहे.

महत्वाची अपडेट! २९ महापालिकांच्या महापौरांचे आरक्षण या दिवशी जाहीर होणार; मंत्रालयात सुटणार आरक्षणाची सोडत! 

कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि शिंदे गट एकत्र आला तर स्पष्ट बहुमत मिळू शकते, अशा चर्चा सुरू आहेत. मुंबईतील सत्ता समीकरणांवर राज्यातील इतर महापालिकांचे निर्णयही अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये महायुती विरोधात शिंदेंची शिवसेना असे चित्र आहे. यामुळे कागलमध्ये शिंदेसेनेला काँग्रेस सोबत घेऊ शकेल का? असा सवाल सतेज पाटील यांना करण्यात आला. यावेळी पाटील यांनी आज त्यावर बोलणे संयुक्तिक नाही, परवा तुम्हाला कळेल, असे सूचक विधान सतेज पाटील यांनी केले.

महापौरपदाबाबत मी आज बोलू शकत नाही. बॅकडोअरची चर्चा आम्ही पुढे आणू शकत नाही, असे सांगत ,सतेज पाटील यांनी सूचक विधान केले. अजून महापौरपदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. सध्या आम्ही महापालिकेतून जिल्हा परिषदेत गेलेलो नाही. यातच माझ्या मुलग्याचे लग्न आहे. त्यामुळे मला यावर बोलायला थोडा वेळ द्या, असंही पाटील म्हणाले. 

"महानगरपालिकेत मिळालेल्या यशामुळे आता जिल्हा परिषदेसाठी चांगले वातावरण झाले आहे, असंही पाटील म्हणाले. शक्तिपीठला लोकांचा विरोध कायम आहे. तुम्ही जर चार-चारवेळा जर अलायमेंट बदलत असाल तर तुम्हाला त्याची गरज नाही, असंही सतेज पाटील म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress, Shinde Sena may unite in Kolhapur; Satej Patil hints.

Web Summary : Kolhapur may see Congress and Shinde Sena alliance after local elections. Satej Patil hinted at potential backroom deals regarding mayoral post and district council elections, keeping details secret. Discussions are ongoing.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील