महत्वाची अपडेट! २९ महापालिकांच्या महापौरांचे आरक्षण या दिवशी जाहीर होणार; मंत्रालयात सुटणार आरक्षणाची सोडत! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 12:53 IST2026-01-19T12:52:45+5:302026-01-19T12:53:08+5:30

Mayor Reservation Lottery Maharashtra 2026: महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत २२ जानेवारी २०२६ रोजी मंत्रालयात निघणार आहे. नगर विकास राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडेल.

Important update! Reservations for mayors of 29 municipalities will be announced on this day; The lottery for reservations will be held in the Ministry! | महत्वाची अपडेट! २९ महापालिकांच्या महापौरांचे आरक्षण या दिवशी जाहीर होणार; मंत्रालयात सुटणार आरक्षणाची सोडत! 

महत्वाची अपडेट! २९ महापालिकांच्या महापौरांचे आरक्षण या दिवशी जाहीर होणार; मंत्रालयात सुटणार आरक्षणाची सोडत! 

मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष 'शहराचा प्रथम नागरिक' कोण होणार, याकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणाची अधिकृत सोडत गुरुवार, २२ जानेवारी २०२६ रोजी मंत्रालयात काढली जाणार आहे.

नगर विकास विभागाच्या पत्रानुसार, ही सोडत राज्याच्या नगर विकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. मंत्रालयातील ६ व्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी ११.०० वाजल्यापासून या प्रक्रियेला सुरुवात होईल. या सोडतीद्वारे अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास प्रवर्ग (OBC) आणि महिलांसाठीचे महापौरपद निश्चित केले जाणार आहे.

दिग्गजांची धाकधूक वाढली 
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांसह राज्यातील २९ महापालिकांमध्ये आरक्षणाची ही सोडत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघते, यावरच अनेक राजकीय दिग्गजांचे महापौर होण्याचे स्वप्न अवलंबून आहे. जर एखाद्या पालिकेत खुल्या प्रवर्गाचे आरक्षण आले, तर चुरस अधिक वाढण्याची शक्यता आहे.

या सोडतीसाठी नगर विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले असून, राज्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवांना या नियोजनाची माहिती देण्यात आली आहे. २२ जानेवारीच्या दुपारपर्यंत राज्यातील २९ शहरांच्या महापौरपदाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title : 29 नगर निगमों के महापौरों के लिए आरक्षण 22 जनवरी, 2026 को

Web Summary : मुंबई में 22 जनवरी, 2026 को 29 नगर निगमों के महापौरों के लिए आरक्षण निकाला जाएगा। इससे एससी, एसटी, ओबीसी और महिलाओं के लिए आरक्षण निर्धारित होगा। यह घोषणा मुंबई, पुणे और नाशिक जैसे प्रमुख शहरों में राजनीतिक आकांक्षाओं को प्रभावित करती है, जिससे राजनीतिक हलकों में उत्सुकता है।

Web Title : Mayoral Reservation Draw for 29 Municipalities on January 22, 2026

Web Summary : The mayoral reservation draw for 29 municipalities will be held on January 22, 2026, in Mumbai. This will determine reservations for SC, ST, OBC, and women. The announcement impacts political aspirations across major cities like Mumbai, Pune and Nashik, creating anticipation among political figures.