लक्ष्मीपुरीत ‘ऑक्सिजन आपल्या दारी’अंतर्गत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:17 IST2021-06-21T04:17:00+5:302021-06-21T04:17:00+5:30

कोल्हापूर : येथील वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन, रविवार पेठेतील विठ्ठल माने परिवार व आजरेकर फाऊंडेशन यांच्यामार्फत रविवारी ‘ऑक्सिजन आपल्या दारी’ ...

Plantation under 'Oxygen at Your Doorstep' in Laxmipur | लक्ष्मीपुरीत ‘ऑक्सिजन आपल्या दारी’अंतर्गत वृक्षारोपण

लक्ष्मीपुरीत ‘ऑक्सिजन आपल्या दारी’अंतर्गत वृक्षारोपण

कोल्हापूर : येथील वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन, रविवार पेठेतील विठ्ठल माने परिवार व आजरेकर फाऊंडेशन यांच्यामार्फत रविवारी ‘ऑक्सिजन आपल्या दारी’ या उप्रकमांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला.

शहरातील लक्ष्मीपुरी परिसरातील चांदणी चौक, दुर्गा माता गल्ली येथे "ऑक्सिजन आपल्या दारी" मोहिमेअंतर्गत रविवारी सोनचाफा, पारिजात, टीकोमा, कडुलिंब, सदाफुली, पांढरी सावर, करंज अशी देशी झुडूप पद्धतीची फुलझाडे लावण्यात आली. विठ्ठल माने यांची कन्या पूनम काळे हिच्या वाढदिवसानिमित्ताने तिच्या हस्ते काही झाडे लावण्यात आली.

आजच्या मोहिमेसाठी विठ्ठल माने, गणी आजरेकर, वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशनचे अमोल बुद्दे, स्वप्नील खाडे व त्यांचे सहकारी, कुणाल माने, अमेय काळे, सुनील लोहार, सागर गिर्जे व भागातील नागरिक उपस्थित होते. विठ्ठल माने यांनी झाडे तसेच आजरेकर फाऊंडेशन तर्फे लोखंडी ट्री गार्ड उपलब्ध करून दिले.

फोटो क्रमांक - २००६२०२१-कोल- वृक्षारोपण

फोटो ओळी - कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी परिसरात रविवारी ‘ऑक्सीजन आपल्या दारी’या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: Plantation under 'Oxygen at Your Doorstep' in Laxmipur