शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

प्लँचेट - भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:26 IST

‘राजाची बाॅडी नेताना कोणीच रडलं नाही. माणसं किती निर्दयी होती.’ राॅड्रिग म्हणाला. ‘राजा तरी कुठं गुणाचा होता. त्यानं परवा ...

‘राजाची बाॅडी नेताना कोणीच रडलं नाही. माणसं किती निर्दयी होती.’ राॅड्रिग म्हणाला.

‘राजा तरी कुठं गुणाचा होता. त्यानं परवा सायली मॅडमला रागाने लाथ मारली होती. तो बेडशीटच बदलू देत नव्हता.’ बुरटे मॅडम म्हणाली.

‘कोण झोपलंय, कोण जागं आहे. कुणाला काही त्रास आहे का? यासाठी एक राऊंड मारते.’ म्हणत अंजली नर्स खुर्चीतून उठली व वाॅर्डमधून फेरी मारू लागली. ‘अहो अनुसयाबाई काही त्रास होतोय का? विव्हळता कशाला?’ तिनं एका पेशंटला विचारलं.

‘तो टीव्ही बंद करा. मला झोप लागेना.’ अनुसया म्हणाली.

‘बरं बरं!’ म्हणत अंजलीनं टीव्ही बंद केला. रात्र वाढत होती. टीव्ही बंद होताच शांतता वाटू लागली आणि अंजलीचं लक्ष अठ्ठावीस नंबरच्या बेडवर गेलं. राजा भिंतीला टेकून बसला होता व तो अंजलीकडं एकटक पाहत होता.

‘हा तर मेला... मग इथं कसा...’ अंजली घाबरून बाहेर पळत आली. तिनं राॅड्रिगला सर्व प्रकार सांगितला.

‘मॅडम, तुम्हाला भास झाला असेल. राजाची बाॅडी त्याच्या घरी पोहोचलीही असेल. कदाचित स्मशानातही नेली असेल.’ राॅड्रिग म्हणाला. त्यांची बडबड गडबड ऐकून बुरटे मॅडम व शांताराम आले. त्यांनीही अंजलीला वेड्यात काढलं आणि मग शांतारामनं विचारलं, ‘चहा घेणार का? मी थर्मास भरून आणलाय.’

‘हो हो, चहा दे बाबा, मला तर कापरंच भरलंय.’ अंजली थरथरत म्हणाली.

मग भुताखेताचा विषय निघाला. तो चहाच्या घोटाबरोबर रंगत गेला. शांताराम म्हणाला, “अंजली मॅडम मी तर पाच वर्षे शवागारात कामाला होतो. एकदा चुकून मी भलतीच बाॅडी दिली. तो नंबर इंग्रजीत होता. नव्याण्णव का सहासष्ट कळला नाही. मी सहासष्ट नंबरची बाॅडी नव्याण्णववाल्यांना दिली. माझी मग चौकशी झाली आणि माझी सरकारी दवाखान्यातली नोकरी गेली.’

‘दवाखाना म्हटलं की, मोठी जबाबदारी असते. लहानशी चूकसुद्धा चालत नाही.’ बुरटे मॅडम म्हणाली.

‘मी अठ्ठावीस नंबरच्या बेडवरून नजर टाकून येतो. उगाच अंजली मॅडमना भीती वाटायला नको. म्हणत राॅड्रिग वाॅर्डमध्ये गेला. सर्व पेशंट्स झोपले होते. घड्याळात रात्रीचा दीड वाजला होता. राॅड्रिगने अठ्ठावीस नंबर बेडवरचे बेडशीट ओढला, तर त्याखाली सिगारेटचे पाकीट, लायटर आणि वीस रुपयांची नोट दिसली. राॅड्रिगने ते सर्व आपल्या खिशात ठेवले आणि पुन्हा गप्पा मारायला गॅलरीत आला. ‘अंजली मॅडम मी बेडशीट ओढून पाहिले तिथं राजाबाजा कोणी नाही. उगाच भीताय तुम्ही.’

‘नाही रे राॅड्रिग मी राजाला पाहिला.’ अंजली ठामपणे म्हणाली. यावर बुरटे मॅडम व शांताराम हसू लागले.

‘राजा इथे आहे का नाही, हे पाहायला आपण प्लँचेट करूया.’ राॅड्रिग म्हणाला.

‘प्लँचेट...?’ तिघेही एका सुरात बाेलले.

‘ही एक सोपी पद्धत आहे. त्या समोरच्या मडक्यावर स्टीलची प्लेट व ग्लास स्वच्छ पाण्याने धुवायचा. पुन्हा प्लेटवर ग्लास उफडा ठेवायचा व तिघांनी त्या ग्लासवर आपले बोट ठेवून म्हणायचे, ‘राजा साळंबे तू जर इथे असलास तर खूण म्हणून हा ग्लास खाली पडेल.’

‘मग?’

‘राजाचा आत्मा इथे असेल तर ग्लास खाली पडेल.’ राॅड्रिग बोलला

‘नको रे बाबा असला काही प्रयोग...’ अंजली.

‘तुम्ही तर भित्र्या भागूबाई आहात. आम्ही तिघे आहोत, आम्ही मिळून प्लँचेट करू.’ राॅड्रिग छाती पुढे काढत म्हणाला.

शांतारामनं मडक्यावरची स्टीलची प्लेट आणि ग्लास धुतला. तिघे त्या मडक्याजवळ आले. अंजली दूर उभी राहून त्यांची कृती पाहू लागली. तिघांनी ग्लासवर बोट ठेवले. राॅड्रिग म्हणाला, ‘राजा साळंबे, जर तू आता इथं उपस्थित असशील तर हा ग्लास खाली पडेल.’ असे म्हणून ते तिघे बाजूला झाले व अंजलीकडे आले. अंजली एकटक त्या ग्लासकडे पाहत होती. ग्लास सरकत हळूहळू काठाशी आला आणि खळ्ळकन् खाली पडला.

अंजली ते पाहून खो - खो हसू लागली. ते तिघे तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतानाच अंजली पुरुषी आवाजात बोलली - ‘मी राजाऽऽ’

आणि ती गरागरा डोळे फिरवू लागली.