शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
3
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
4
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
5
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
6
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
7
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
8
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनेल का विजय थलपती?
9
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
10
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
11
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
12
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
13
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
14
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
15
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
16
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
17
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
18
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
19
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
20
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
Daily Top 2Weekly Top 5

कारभार चव्हाट्यावर येऊ नये यासाठीच ‘कुंभी-कासारी’ची सभा ऑनलाईन घेण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:25 IST

कोपार्डे : ऊस बिले, तोडणी, वाहतूक बिले, कामगारांचा पगार थकल्याने कुंभी-कासारी साखर कारखान्यातील सत्तारूढ गटाचा कारभार ...

कोपार्डे : ऊस बिले, तोडणी, वाहतूक बिले, कामगारांचा पगार थकल्याने कुंभी-कासारी साखर कारखान्यातील सत्तारूढ गटाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासद या मुद्द्यावरून आक्रमक होतील या भीतीनेच ‘कुंभी-कासारी’ची सभा ऑनलाईन घेण्याचा घाट घातला असल्याचा आरोप यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी केला. कुंभी-कासारी कारखान्याची सभा सभासदांच्या हक्कांसाठी ऑफलाईन घ्यावी, अशी मागणीही शाहू आघाडीच्यावतीनेे निवेदनाद्वारे करण्यात आली. एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुंभी-कासारीचे उपाध्यक्ष निवास वातकर यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. यावेळी संचालक निवास पाटील, प्रकाश पाटील, सुभाष पाटील उपस्थित होते.

यावेळी एकनाथ पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत गाळप झालेल्या उसाची बिले मिळालेली नाहीत. यामुळे सेवा सोसायटीची कर्जे, वीज बिल, घरगुती कार्यक्रम व घरखर्चासाठी लागणाऱ्या पैशांसाठी सावकारांच्या पुढे हात पसरावे लागत आहेत. मार्च महिन्याच्या आत जर उसाची बिले मिळाली नाहीत, तर पीक कर्ज घेणारा शेतकरी कृषी कर्ज व्याज सवलत योजनेला मुकणार आहे. कामगारांचे अकरा महिन्यांचे पगार, ऊस तोडणी, वाहतूक बिले थकली आहेत. याबाबत विरोधक आक्रमक होतील म्हणून कुंभीच्या प्रशासनाने ऑनलाईन वार्षिक सभा घेण्याचा घाट घातला आहे. साखर विक्री व्यवस्था चांगली नसल्याने जुनी तीन लाख साखर पोती विक्रीविना पडून आहेत. यामुळे व्याजाचा भुर्दंड बसत आहे.

यावेळी यशवंत बँकेचे संचालक निवास पाटील यांनी बिले थकल्याने स्थानिक ऊसतोड मजूर व वाहतूकदार दुसऱ्या कारखान्यांकडे वळला आहे. शेतकऱ्यांना खुद्द तोंड करून ऊस कारखान्याला पाठवावा लागत आहे. स्थानिक तोडणी, वाहतूकदारांना वेळेत बिले अदा करा, अशी मागणी त्यांनी केली.

शेतकरी उच्च प्रतीचा ऊस कारखान्याला पाठवत आहे. कुंभीची एफआरपी जादा असल्याचा कांगावा करू नका, या शब्दांत शेतकरी संघटनेचे दादूमामा कामिरे यांनी ठणकावले. यावेळी नामदेव पाटील, युवराज पाटील, दादासो पाटील, एस. एम. पाटील, बी. आर. पाटील उपस्थित होते.

चौकट

जिल्हाधिकाऱ्यांचा ऑफलाईन सभा घेण्यास नकार

‘कुंभी-कासारी’ची वार्षिक सभा ऑफलाईन घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली होती; पण कोरोना संसर्गामुळे ऑफलाईन सभा घेण्यास परवानगी दिलेली नाही, असे कुंभी-कासारीचे उपाध्यक्ष निवास वातकर यांनी सांगितले. वातकर म्हणाले, तोडणी, वाहतूकदारांना वेळेत बिले देण्यासाठी प्राधान्य देत आहोत. कुंभीचे प्रशासन शेतकऱ्यांचे हित सांभाळण्यासाठी प्राधान्य देते. कोरोनाच्या काळात साखर विक्री ठप्प झाली, याचबरोबर साखरेचे दर घसरल्याने व शासनाने दिलेल्या किमान विक्री दरापेक्षा कमी दराने विक्री करता येत नाही, यामुळे साखर शिल्लक आहे. कर्मचाऱ्यांना जशी रक्कम उपलब्ध होईल, तसे पगार देत आहे. शासकीय देणी वेळेत अदा करत आहे. थकबाकी वाढू नये यासाठी प्रयत्न आहेत.

शासनाच्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन सभेचे नियोजन असून, यात प्रश्न विचारण्याची मुभा राहणार आहे. सभासदांचे हक्क डावलले जाणार नाहीत याकडे लक्ष दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

फोटो

: ०८ कुंभी-कासारी कारखाना निवेदन

कुंभी-कासारी कारखान्याने ऑफलाईन सभा घेऊन सभासदांचा हक्क जपावा, अशा मागणीचे निवेदन यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले. यावेळी उपाध्यक्ष निवास वातकर यांनी निवेदन स्वीकारले.