केआयटीमध्ये रविवारपासून ‘पायोनियर’ रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST2021-04-03T04:21:46+5:302021-04-03T04:21:46+5:30

या पायोनिअरचे उद्‌घाटन रविवारी अदानी ग्रुपचे सह.अध्यक्ष संजय कोठा यांच्या हस्ते, तर आयएसटीईच्या महाराष्ट्र गोवा विभागाचे प्रभारी अध्यक्ष डॉ. ...

Pioneer will be playing at KIT from Sunday | केआयटीमध्ये रविवारपासून ‘पायोनियर’ रंगणार

केआयटीमध्ये रविवारपासून ‘पायोनियर’ रंगणार

या पायोनिअरचे उद्‌घाटन रविवारी अदानी ग्रुपचे सह.अध्यक्ष संजय कोठा यांच्या हस्ते, तर आयएसटीईच्या महाराष्ट्र गोवा विभागाचे प्रभारी अध्यक्ष डॉ. रणजित सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

पहिल्या दिवशी कोड ओ फिस्टा (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलि-कम्युनिकेशन विभाग), द रॉयल सी (कॉम्प्युटर सायन्स), टेक्नोक्वीझ (मेकॅनिकल), इन्व्हीजन (पर्यावरणशास्त्र) स्पर्धा होतील.

दुसऱ्या दिवशी टेक क्वीझ (जैवतंत्रज्ञान विभाग), कैझेन (स्थापत्य), ब्रोन हंटर (इलेक्ट्रीकल), हायर्ड ऑर फायर्ड, जावा हेस्ट, इनइरा, इन्व्हीजन या स्पर्धा होणार आहेत. पारितोषिक वितरण आयएसटीईचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई आणि शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते हाेईल. आयएसटीईच्या स्डुटंड चॅप्टर अध्यक्षपदी दिविजा भिवटे हिची नियुक्ती केली आहे. स्पर्धेचे समन्वयक म्हणून ग्रंतेज ओतारी, सहसमन्वयक म्हणून अभिजीत पाटील काम पाहत आहेत.

चौकट

दीड लाखांची बक्षीसे

या स्पर्धेसाठी दीड लाख रुपयांची रोख बक्षिसे, प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. स्पर्धेत ७५० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

Web Title: Pioneer will be playing at KIT from Sunday