शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

विमान बिल्डिंगमधील अभ्यासिका सुरू

By admin | Updated: November 14, 2014 23:57 IST

कुलगुरूंचे आदेश : प्रशासनाची कार्यवाही

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विमान बिल्डिंगमधील अभ्यासिका कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी दिलेल्या आदेशानंतर पूर्ववत सुरू झाली. त्यामुळे महाविद्यालयीन, विद्यापीठातील, तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. याबाबत विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाची सचिव श्वेता परुळेकर हिने पाठपुरावा केला होता.याबाबत तिने कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, विमान बिल्डिंग अभ्यासिकेसाठी वापरली जाते. या ठिकाणी विद्यापीठ तसेच विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेचे ओळखपत्र काढल्यास त्यांना येथे अभ्यासाला बसण्यासाठी परवानगी दिली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी याठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्यास मनाई केली जात होती. शिवाय त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात होती. मात्र, भीतीपोटी त्याबाबत प्रतिक्रिया देण्यास विद्यार्थी पुढे येत नाहीत. या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांबाबत होत असलेला हा प्रकार गंभीर आहे. तरी याची चौकशी करून तातडीने विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका खुली करावी. त्यावर कुलगुरू डॉ. पवार यांनी संबंधित विभागप्रमुखांना याबाबत सूचना देऊन विद्यार्थ्यांसाठी विमान बिल्डिंगमधील ही अभ्यासिका पूर्ववत सुरू केली आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यवाहीने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)