शहरं
Join us  
Trending Stories
1
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
4
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
7
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
8
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
9
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
10
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
11
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
12
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
13
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
14
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
15
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
16
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
17
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
20
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फुलारी सांगलीचे नवे पोलीसप्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2015 01:23 IST

अधिकाऱ्यांच्या बदल्या : दिलीप सावंत यांची मुंबईला बदली

सांगली : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांची मुंबईला पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली असून, बदलीचे आदेश बुधवारी सायंकाळी आले. त्यांच्या जागी नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीचे प्राचार्य सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिलीप सावंत यांनी जून २०१२ मध्ये सांगलीचे पोलीसप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकालात विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका शांततेत व सुरळीत झाल्या. ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ विरुद्धची कारवाई, रस्ता सुरक्षा मोहीम, वाहतुकीला शिस्त, खासगी सावकारी याबाबत त्यांनी जोरदार मोहीम उघडली. जिल्ह्यात सर्वाधिक नाकाबंदी, ‘को5ैम्बिंग आॅपरेशन’ मोहीम राबविण्याची नोंद सावंत (पान १० वर) यांच्या कारकीर्दीत झाली. त्यांनी जिल्ह्णातील सराईत गुन्हेगार असणाऱ्या सात टोळ्यांवर ‘मोक्का’ कायद्यांतर्गत कारवाई करून ५६ गुंडांना गजाआड केले. त्यांच्या मोक्का कारवाईला घाबरून अनेक गुन्हेगारांनी पलायन केले आहे. पोलीस-नागरिक समन्वय बैठक, पोलिसांची आरोग्य तपासणी, पोलीस आपले मित्र, पोलीस कल्याणाचे कार्यक्रम आदी मोहिमाही त्यांनी चांगल्याप्रकारे राबविल्या. वर्षापूर्वी त्यांना भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) दर्जा मिळाला.दिलीप सावंत यांच्या जागी नाशिकहून महाराष्ट्र पोलीस अकादमीचे प्राचार्य सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते सोमवारी १८ रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.सांगली जिल्ह्यात काम करताना वेगळा आनंद मिळाला. बदली होऊन जाताना चांगल्या कामाचे समाधान वाटत आहे. गेल्या दोन, तीन महिन्यांपासून बदलीच्या प्रतीक्षेत होतो. येथील नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले. गुन्हेगारीवर नियंत्रण आणले. सहकारी अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. - दिलीप सावंत, मावळते पोलीस अधीक्षक, सांगली.