शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर शौचास बसणाऱ्याचे झळकते छायाचित्र

By admin | Updated: November 30, 2015 01:15 IST

कुरुंदवाड नगरपालिका : गांधीगिरी कारवाईची नागरिकांतून धास्ती

कुरुंदवाड : येथील नगरपालिका प्रशासनाने शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. वैयक्तिक शौचालय अनुदानाबरोबर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक शौचालय असतानाही अनेक नागरिक उघड्यावर शौचास बसत असल्याने पालिकेने नामी शक्कल लढविली आहे. उघड्यावर शौचास बसणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्र काढून शहरातील प्रमुख चौकात लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गुडमॉर्निंग पथकाची नेमणूक करण्यात आली असून, पथकाच्या या गांधीगिरी कारवाईची नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.पालिकेने ३१ डिसेंबरअखेर शहर हागणदारीमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणपणे २५ हजार लोकसंख्या असलेल्या या शहरात सुमारे ३०० सार्वजनिक शौचालये आहेत. कुटुंब संख्येनुसार सर्व्हे करून वैयक्तिक शौचालय बांधणाऱ्या कुटुंबीयांना १७ हजारांचे अनुदानही देण्यात येत आहे. मात्र, असे असतानाही शहरातील काही भागांत उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.पथक पहाटे विविध भागांत फिरून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचे व्हिडिओ शूटिंग व छायाचित्रकाढण्यात येते. या व्यक्तींची छायाचित्रे शहरातील प्रमुख चौकात मोठा डिजिटल फलक उभारून त्यावर लावण्यात येत आहेत. सन्मित्र चौक, थिएटर चौक, पालिका चौक व दर्गा चौकात पालिकेने मोठे डिजिटल फलक उभारले आहेत.या अभिनव व गांधीगिरी कारवाईची शहरवासीयांनी चांगलीच धास्ती घेतली असून, उघड्यावर शौचास बसणारे सार्वजनिक शौचालयांचा आधार घेत आहेत. (वार्ताहर)शनिवारी पहाटे गुडमॉर्निंग पथकाला शौचालयास बसलेले सातजण आढळले. या पथकाने त्यांची छायाचित्रे काढून ठिकठिकाणी चौकात उभारलेल्या डिजिटल फलकांवर लावण्यात आली. ते पाहण्यासाठी शहरवासीयांनी गर्दी केली होती. मात्र, छायाचित्र असलेल्या नागरिकांनी रातोरात फलकांवरील छायाचित्रे काढून टाकली आहेत. त्यामुळे या कारवाईची भीती नागरिकांतून चर्चिली जात आहे.