शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

वर्ग २ च्या जमिनींची खरेदी-विक्री जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने

By admin | Updated: July 4, 2016 00:33 IST

अंमलबजावणी सुरू : नागरिकांचे मुंबई, पुण्याचे हेलपाटे वाचणार

प्रवीण देसाई ल्ल कोल्हापूर शासन व विभागीय आयुक्त स्तरावर असलेल्या वर्ग २ च्या जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या परवानगीचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत. याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. वर्ग २ म्हणजे सरकारी हक्कातील जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या परवानगीचे अधिकार राज्य शासन व विभागीय आयुक्त कार्यालय स्तरावर होते. महानगरपालिका व सर्व ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या हद्दीतील जमिनींचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले जात होते; तर संपूर्ण ग्रामीण भागासह ‘ब’ व ‘क’ वर्ग नगरपालिका हद्दीतील जमिनींचे प्रस्ताव अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंजुरीसाठी पाठविले जात होते. त्यानंतर विभागीय आयुक्त व राज्य शासन स्तरांवर त्याच्या परवानग्या दिल्या जायच्या. त्यामुळे नागरिकांना परवानगीसाठी वारंवार पुण्या-मुंबईच्या वाऱ्या कराव्या लागायच्या; परंतु आता शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ३७ मध्ये सुधारणा करून ‘३७-अ’ हे नवीन कलम केले आहे. त्याप्रमाणे राज्य शासन व विभागीय आयुक्त स्तरावरील वर्ग २ च्या जमिनींच्या खरेदी-विक्रीचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याबाबतचा शासन अध्यादेश होऊन विभागीय आयुक्तांकडून यानुसार कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला निर्देश देण्यात आले आहेत. या कार्यालयातून याबाबतची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या शासन अध्यादेशामुळे वर्ग २ च्या जमिनीं (उदा. सरकार हक्कातील जमिनींची शेती, औद्योगिक, शैक्षणिक, सार्वजनिक क्रीडांगण, आदी)च्या खरेदी-विक्रीची अंतिम परवानगी आता जिल्हाधिकारी देतील. परवानगी घेताना जमिनीच्या चालू बाजारभावाच्या दराच्या ५० टक्के रक्कम शासनाला भरावी लागते. तसेच अटी व शर्ती भंग झालेल्या जमिनींच्या परवानगीसाठी ७५ टक्के रक्कम भरावी लागते. आता ही रक्कम भरताना ती थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरच मान्यता घेऊन भरता येणार आहे. त्याचबरोबर ग्रीन झोन (हरित पट्टा)मध्ये औद्योगिक वापरासाठी बांधकाम करणे व त्यावर ‘एफएसआय’ (वाढीव निर्देशांक) देण्यासाठी परवानगीचे अधिकारही जिल्हाधिकाऱ्यांना मिळाले आहेत.