शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला

By admin | Updated: September 19, 2015 00:39 IST

मुस्लिम संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

शिरोळ : राष्ट्रीय कामगार नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांची हत्या करणाऱ्या संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या खुनी हल्ल्यातील संशयित आरोपी समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा साधक आहे. या सनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशा मागणीचे निवेदन मुस्लिम हक्क संघर्ष समितीच्यावतीने येथील तहसीलदार सचिन गिरी यांना शुक्रवारी देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, पुरोगामी विचार चळवळीचा व ऐतिहासिक वारसा असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात पुरोगामी चळवळ रोखण्याचा प्रयत्न झाल्यास जनता कदापि सहन करणार नाही. सनातन ही संस्था धार्मिक द्वेष पसरवणारी व बहुजन समाजातील तरुणांची माथी भडकावणारी कट्टरवादी संघटना आहे. कामगार नेते गोविंदराव पानसरे यांच्यावर खुनी हल्लाप्रकरणी संशियत आरोपी म्हणून सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे सनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी आणावी, असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी तहसीलदार गिरी यांनी शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारून शासनास त्वरीत भावना कळवू, असे आश्वासन दिले.शिष्टमंडळात संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष अस्लम मुल्ला, उपाध्यक्ष अरिफ मुजावर, मुबारक बागवान, मेहबूब बागवान यांच्यासह राजेंद्र प्रधान, कमरोद्दीन पटेल, दलित सेनेचे सुनील कुरुंदवाडे, जमीर नदाफ, दिगंबर सकट, खंडेराव हेरवाडे होते. (प्रतिनिधी)