शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मारेकरी शोधण्यासाठी जनआंदोलन उभारणार

By admin | Updated: February 21, 2017 03:54 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी यांचे मारेकरी शोधण्यात अजून यश आले नाही

कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी यांचे मारेकरी शोधण्यात अजून यश आले नाही याची महाराष्ट्र आणि कर्नाटक शासनाला लाज वाटली पाहिजे. मारेकऱ्यांना शोधण्यासाठी आम्ही दबाव वाढविणार आहोत. यासाठी देशभरातील लेखकांच्या माध्यमातून जनआंदोलन उभारणार आहे, असे मध्यप्रदेश प्रगतीशील लेखक संघाचे प्रादेशिक महासचिव विनीत तिवारी व अध्यक्ष राजेंद्र शर्मा यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्मृती जागर सभेनिमित्त मध्यप्रदेशमधील ११ लेखक, कवी कोल्हापुरात आले होते. यावेळी तिवारी आणि शर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.तिवारी म्हणाले, डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी या विचारवंतांच्या कर्मभूमीमध्ये जाऊन तेथील संवेदनशील लोकांशी संवाद साधण्यासाठी मध्यप्रदेशमधील लेखकांनी १४ फेब्रुवारीपासून पुणे येथील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेतून सहादिवसीय संवाद यात्रा सुरू केली. सातारा येथे डॉ. दाभोलकर कुटुंबीय व अंनिसचे कार्यकर्ते, गोवामध्ये लेखक, स्थानिक लोक आणि धारवाड येथे प्रा. कलबुर्गी कुटुंबीय, काही कन्नड भाषिक लेखक, साहित्यकार डॉ. गणेश देवी, जनआंदोलनकारी एस. आर. हिरेमठ यांच्याशी संवाद साधून सोमवारी कोल्हापुरात कॉ. पानसरे स्मृतिजागर सभेत समारोप करण्यात आला. विवेकपूर्ण समाजाची रचना करण्याची गरज असून, त्यादृष्टीने आम्ही लेखक, कवी योगदान देत आहोत, असे राजेंद्र शर्मा यांनी सांगितले. पानसरे यांच्या हत्येला दोन वर्षे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन ४२ महिने होऊनही अद्याप तपास लागला नाही, याबाबत संताप व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी महर्षी वि. रा. शिंदे पुलावर जाऊन सोमवारी निषेध आंदोलन केले. (प्रतिनिधी)‘मॉर्निंग वॉक’ करून राज्य सरकारचा निषेधगोळ्या घाला, लाठ्या मारा, विचार नाही मरणार...असा विश्र्वास जागवत सोमवारी सकाळी कोल्हापूरातील प्रमुख मार्गांवरून पुरोगामी कार्यकर्त्यांनी पानसरे-दाभोलकर-कलबुर्गी यांच्या विचारांचा जागर केला. सम्राटनगर येथील पानसरे यांच्या निवासस्थानापासून या मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली.