शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बनावट हिंदुहृदयसम्राट बनवण्याचा भाजपचा प्रयत्न जनतेने झिडकारला - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 12:24 IST

आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडलेले नाही, सोडणार नाही.. तुम्ही काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तीसोबत सरकारमध्ये गेला त्यावेळी तुमचे हिंदुत्व कोठे गेले होते?

कोल्हापूर : विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघात भाजपने काँग्रेसला छुपी मदत केली होती. तशी छुपी युती आम्ही करत नाही. शिवसेना समोरून वार करते, पाठीत वार करणारी आमची औलाद नाही. हिंदुत्वाचे पेटंट एकट्या भाजपनेच घेतले आहे का, अशी रोखठोक विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. भाजपने नकली भगव्याचा बुरखा पांघरला असून, तो या निवडणुकीत फाटल्याशिवाय राहणार नाही, असेही ठाकरे यांनी बजावले.कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संबोधित केले.मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडलेले नाही, सोडणार नाही.. तुम्ही काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तीसोबत सरकारमध्ये गेला त्यावेळी तुमचे हिंदुत्व कोठे गेले होते? भाजपने देशात बनावट हिंदुहृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, मात्र जनतेने तो झिडकारून लावला. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल भाजपला एवढेच प्रेम होते तर त्यांच्या खोलीत दिलेला शब्द अमित शहा यांनी का पाळला नाही. भाजपला अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांनीच भगवी दिशा दाखवली; परंतु त्यांचा आता भाजपला विसर पडला आहे.ग्रामपंचायतपासूनच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा फोटो पाहतो, ते पंतप्रधान आहेत की सरपंच हेच कळत नाही. काल देेवेंद्र फडणवीस कोल्हापूरला येऊन गेले, विकासावर बोलण्यासारखे काहीच नसल्याने त्यांनी धार्मिक मुद्द्यावर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्वाचे पेटंट केवळ भाजपने घेतले आहे का? आतापर्यंत जनसंघ, जनता पक्ष मग भाजप असे किती रंग बदलले. शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला भगवी दिशा दाखवली याचा विसर पडला आहे. सीमा भागातील मराठी माणसावर अत्याचार होत असताना तुमची तोंडे का बंद होती? तेथील शिवरायांचा भगवा उतरवला, त्यावेळी तुमचे हिंदुत्व कोठे गेले होते..?

कोल्हापूर बालेकिल्ला..कोल्हापूर भगव्याचा बालेकिल्ला आजही आहे आणि उद्याही राहील. मर्दासारखे कसे लढावे, हे कोल्हापूरकरांकडून शिकावे. कोल्हापूर हिंदुत्वाचा ठसा पुसू देणार नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.

भाजप खोटे बोलण्यात पटाईत

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार उत्तम चाललेले आहे, जनतेच्या विकासाचे अनेक निर्णय आम्ही घेत आहोत, फक्त आम्ही खोटे बोलत नाही, येथेच कमी पडत आहोत. कमी पडलो तरी चालेल; पण खोटे बोलणार नाही. खोटे बोल, पण रेटून बोल ही भाजपची सवय आहे.

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkolhapurकोल्हापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv Senaशिवसेना