शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गुढीपाडव्याला ३५१ भरा, अंबाबाईला साडी अर्पण करा; भाविकांना फसवण्याचा ऑनलाईन फंडा

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 16, 2026 12:59 IST

वारंवार तक्रारी, तरीही बेदखल

इंदुमती गणेश

कोल्हापूर : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर फक्त ३५१ रुपये भरा आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाईला साडी अर्पण करा, ११ हजार रुपये भरा देवीचा प्रसाद, हळदी-कुंकू मिळवा. समाज माध्यमावरील एआय जनरेटेड व्हिडीओच्या माध्यमातून भाविकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे.

यजमानसारख्या अनेक पेजवरून केल्या जाणाऱ्या या जाहिरातींना हजारो व्हि्यूज आणि लाइक असून, ते मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती किंवा अंबाबाईचे श्रीपूजक यांनी यापूर्वीही सायबर क्राइम विभागाला तक्रार केल्यानंतरही कारवाई झाली नाही.

देशातील ५१ व महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील देवता असलेल्या श्री अंबाबाईच्या नावाखाली अनेक समाज माध्यमांवरून भाविकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू आहे. आता सध्या सुरू असलेल्या एका एआय जाहिरातीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अंबाबाईला साडी अर्पण करणे भाग्याचे असून, फक्त ३५१ रुपये पाठवून तुम्ही साडी अर्पण करू शकता.

वाचा: अंबाबाईच्या दर्शनाचा मार्ग प्रशस्त होणार; सुधारित ५९५ कोटींच्या आराखड्यात प्रस्तावित 

त्यानंतर तुम्हाला २४ तासांच्या आत पूजेचा विधी, ब्लाऊज पीस, आणि हळदी-कुंकू पाठवले जाईल. बुकींग स्लॉट मर्यादित आहे, लवकर बुकींग करा, असे सांगितले जात आहे. याबाबत देवस्थान समिती आणि श्रीपूजकांना विचारले असता, ही सगळी फसवणूक असल्याचे सांगण्यात आले. देवस्थान किंवा पुजारी यांच्याकडून अशी कोणतीही जाहिरात केली जात नाही.

अधिकृत वेबसाइट, पेजची खात्री करा

अधिकृत पूजा विधी या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळ या दोन जबाबदार घटकांकडून केल्या जातात. तसे त्यांच्या समाज माध्यमांवर अधिकृत वेबसाइट आहेत.

यापूर्वीही फसवणूक

  • छत्रपती संभाजीनगरमधील महिला भाविकाने एका श्रीपूजकांचे नाव वाचून ११ हजार रुपये संबंधितांना पाठवले. प्रसाद मिळाला नाही, म्हणून त्यांनी श्रीपूजकांना विचारणा केली, तेव्हा फसवणूक झाल्याचे कळाले.
  • तीन वर्षांपूर्वी अंबाबाईला नव्याने दागिने घडवण्यात येणार आहे, तुमच्या इच्छेने सोने दान करा, या जाहिरातीवर एका महिला भाविकाने ४० तोळे सोने दिले होते. नंतर त्यांना फसवणूक झाल्याचे समजले.
  • अंबाबाई मंदिरात जे विधी केले जात नाही, अशा विधींच्या नावाखाली जाहिराती करून ५ हजार, ७ हजार, ११ हजार, २१ हजार रुपयांची मागणी केली जाते. गेल्या पाच वर्षांत फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.
     

तक्रारी बेदखल

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि श्रीपूजकांनी सायबर क्राइमकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतलेली नाही. तपासणी करताना पेज कधी परदेशातले लोकेशन दाखवतात, तर कधी अन्य राज्यातील. मायाजाल असलेल्या समाज माध्यमावरील जाहिराती आज सुरू असतात पैसा मिळाला की, दिसायचे बंद होतात. या विश्वावर बंधन नाही. कारवाई करायची, तर कुणावर आणि कुठे, असा त्यांच्यासमाेर प्रश्न आहे.

समितीने अशा जाहिरातीविरोधात याआधीही तक्रार केली होती. अंबाबाईच्या पूजाविधी, देणगी याबाबत देवस्थान समितीची अधिकृत वेबसाइट आहे. समाज माध्यमांवरील फसव्या जाहिरातींवर भाविकांनी विश्वास ठेऊ नये. अधिकृततेची खात्री करूनच देणगी पाठवावी. - शिवराज नाईकवाडे, सचिव देवस्थान समिती
 

देवस्थान समिती असो किंवा श्रीपूजक कोणाकडूनही अशा जाहिरातीतून देणगी घेतली जात नाही. ही भाविकांची फसवणूक आहे. आम्ही वारंवार पोलिसांकडे याची तक्रार केली आहे. अशा प्रकारांवर वॉच ठेऊन ते बंद करण्यात यावेत. - माधव मुनिश्वर, सचिव, श्री अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळ

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Online scam dupes devotees in Ambabai temple's name.

Web Summary : Devotees are being defrauded through AI-generated videos promising saree offerings and prasad to Ambabai temple for a fee. Despite complaints, no action has been taken against these fraudulent online ads. Devotees should verify the authenticity of websites before donating.