शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट महामंडळ अध्यक्षपदी पाटकर

By admin | Updated: November 9, 2014 00:47 IST

आरोप-प्रत्यारोप सुरूच : चित्रनगरी, वृद्ध कलाकारांच्या मानधनाचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही

कोल्हापूर : गेले दोन महिन्यांपासून वादग्रस्त ठरलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदावर अखेर आज, शनिवारी अभिनेते, दिग्दर्शक विजय पाटकर यांची वर्णी लागली. या निवडीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाटकर यांनी सर्व सभासदांना बरोबर घेऊन कोल्हापूर चित्रनगरीचा विकास आणि वृद्ध कलाकारांच्या मानधनाचा प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही दिली. चित्रपट महामंडळाच्या कोल्हापुरातील कार्यालयात आज दुपारी एक वाजता अध्यक्ष निवडीची बैठक झाली. यावेळी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कार्यवाह सुभाष भुरके, माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, खजिनदार सतीश बिडकर, अभिनेत्री अलका कुबल, संचालक संजीव नाईक, अनिल निकम, इम्तियाज बारगीर, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामती उपस्थित होते. चित्रपट महामंडळाच्या २७ आॅगस्ट २०१३ रोजी झालेल्या बैठकीत अध्यक्षपदासाठी दावा केलेले विजय कोंडके व विजय पाटकर यांना समान मते पडल्यानंतर या दोघांनाही एक-एक वर्षासाठी अध्यक्षपदाचा कालावधी देण्यात आला होता. त्यानुसार माजी अध्यक्ष विजय कोंडके यांची मुदत २७ आॅगस्टला संपणार होती; मात्र उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यावर करण्यात आलेला विनयभंगाचा आरोप प्रकरणात कोंडके यांनी महामंडळाची बाजू घेतली नाही म्हणून ४ आॅगस्टला संचालकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव करून त्यांना पदमुक्त केले होते. कोंडके यांनी या ठरावाला न्यायालयात आव्हान दिल्याने गेले दोन-अडीच महिने अध्यक्ष निवड होऊ शकली नाही. मात्र, आज महामंडळाच्या १० संचालकांनी पाटकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली. यावेळी पाटकर म्हणाले, मी १५ हजार सभासदांचा प्रतिनिधी म्हणून या खुर्चीवर बसलो आहे. गेले सव्वा वर्ष फक्त कोर्टकचेऱ्या आणि वादात गेले आहेत. आता मी संचालकांना व चित्रपटसृष्टीतील कलावंतांना सोबत घेऊन काम करणार आहे, असे सांगितले. तत्पूर्वी, अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.