शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -प्रवाशांनो, घाबरू नका, केवळ दक्षता घ्या-मंत्री अ‍ॅड. अनिल परब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 13:55 IST

कोरोना विषाणूंच्या (व्हायरस ) पार्श्वभूमीवर एस.टी.ने देखील खबरदारीच्या उपाययोजना केल्या असून, प्रवाशांनी घाबरून जाऊ नये; परंतु योग्य ती दक्षता घेऊन प्रवास करावा, असे आवाहन परिवहन मंत्री व एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी केले आहे.

ठळक मुद्देप्रवाशांनो, घाबरू नका, केवळ दक्षता घ्यामंत्री अ‍ॅड. अनिल परब यांचे आवाहन

कोल्हापूर : कोरोना विषाणूंच्या (व्हायरस ) पार्श्वभूमीवर एस.टी.ने देखील खबरदारीच्या उपाययोजना केल्या असून, प्रवाशांनी घाबरून जाऊ नये; परंतु योग्य ती दक्षता घेऊन प्रवास करावा, असे आवाहन परिवहन मंत्री व एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी केले आहे.मंत्री परब यांनी एस.टी. प्रशासनाला निर्देश दिले आहेत, त्यानुसार राज्यातील प्रमुख शहरांतील गर्दीच्या बसस्थानकांवरील बैठक व्यवस्था दररोज दिवसातून दोन-तीन वेळा सॅनिटायझरचा योग्य वापर करून स्वच्छ केली जावी. तसेच बसस्थानकाचा परिसर जंतुनाशकांची फवारणी करून निर्जंतुक केला जावा.

वाहकाकडे कर्तव्यावर निघत असताना, सॅनिटरी लिक्विडची बाटली देण्यात यावी. प्रवाशांच्या गरजेनुसार त्यांनी ती उपलब्ध करावी. याबरोबरच आगारातून बाहेर पडणारी प्रत्येक बस सॅनिटरी द्रवमिश्रित पाण्याने स्वच्छ धुऊनच मार्गस्थ केली जावी.

बसस्थानकावरील उद्घोषणा यंत्रणेद्वारे वेळोवेळी करोना विषाणूंच्या संदर्भात घ्यावयाच्या दक्षतेबाबत प्रवाशांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात. अशा प्रकारे करोना विषाणूंचा (व्हायरस) फैलाव रोखण्यासाठी एस.टी. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून, प्रवाशांनी घाबरून न जाता, योग्य ती दक्षता घेऊन प्रवास करावा, असे आवाहन मंत्री परब यांनी केले आहे.

 

 

टॅग्स :corona virusकोरोनाstate transportएसटीkolhapurकोल्हापूर