कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी २४ तास शिल्लक असताना जिल्ह्यात राजकीय घडामोडी आणखी वेगावल्या आहेत. राधानगरी तालुक्यात ए. वाय. पाटील यांनी काँग्रेससोबत जाण्याचा तर दौलत साखर कारखान्याचे माजी चेअरमन गोपाळराव पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर भुदरगड, राधानगरीतील पेच मिटवण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे मंगळवारी दुपारी भाजपच्या कार्यालयात चर्चेसाठी गेले होते; परंतु राधानगरीचा तिढा तेथे मिटलाच नाही.चंदगड तालुक्यात गोपाळराव पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. एक कोणता तरी गट सोबत घेण्याच्या गरजेतून आमदार शिवाजीराव पाटील यांनी ही जोडणी घातली आहे. त्यामुळे चंदगड तालुक्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट आला आहे. तर उद्धवसेनेचे चंदगड तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर आणि अनिल दळवी यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. तर राष्ट्रवादी (शरद पवार)चे गडहिंग्लज तालुकाध्यक्ष शिवप्रसाद तेली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.आजऱ्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रआजरा तालुक्यातील उत्तूर व पेरणोली या दोन गटांसाठी दोन्ही राष्ट्रवादी व उद्धवसेना एकत्र आली आहे. गट एकत्र आले आहेत. शिंदेसेनेने उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातून मंगळवारी तिघांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मात्र, पेरणोली मतदारसंघातील भाजप व शिंदेसेनेचे उमेदवार अद्यापही जाहीर झालेले नाहीत.
वाचा: अध्यक्षपद खुले; नेत्यांच्या पत्नी, लेकी, सुनांसाठी यंत्रणा हाले; सामान्य कार्यकर्ते वाऱ्यावरभुदरगडमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार), काँग्रेस एकत्रभुदरगड तालुक्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कोणतीही चर्चा अथवा बैठक न झाल्याने राष्ट्रवादी (अजित पवार) आणि काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत असून, शिंदेसेना आणि भाजप एकत्र येऊन लढतील, असे आजचे चित्र आहे. पालकमंत्री आबिटकर यांनी भाजपच्या कोल्हापूर कार्यालयात खासदार धनंजय महाडिक आणि प्रदेश सचिव महेश जाधव यांच्याशी चर्चा केली; परंतु भुदरगडचा निर्णय झाला नाही. के. पी. पाटील यांनी उद्धवसेनेला डावलल्याने तिसरी आघाडी होऊ शकते.हातकणंगलेत बंडखोरीला निमंत्रणहातकणंगले तालुक्यात महायुती आणि महाविकास अशी लढत होण्याची नेत्यांची घोषणा बंडखोरीला निमंत्रण देणारी आहे. शिंदेसेना स्वतंत्र अर्ज भरण्यावर ठाम आहे. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये नेते आपल्याच मुलाबाळांना उमेदवारी देत असल्याने इच्छुकांची कोंडी झाली आहे. भाजप, शिंदेसेना आणि जनसुराज्यमधील चर्चा फिसकटली आहे. दरम्यान, कुंभोज मतदारसंघातून शौमिका महाडिक यांना उमेदवारी द्यावी, यासाठी कार्यकर्त्यांना येथे खासदार महाडिक यांची भेट घेतली.कागलमध्ये नाराजांची समजूतकागल तालुक्यात मंत्री मुश्रीफ, संजय घाटगे व समरजित घाटगे एकत्र आल्यामुळे या तीन गटांत जागा वाटणी झाली. त्यामुळे इच्छुकांची कोंडी झाली आहे. यातूनच बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी (अजित पवार)च्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे. दिवसभर नेतेमंडळी नाराजांची समजूत काढत होती तर मंडलिक गट स्वतंत्र लढण्याच्या तयारीला लागला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य, भाजपचे परशुराम तावरे यांच्या पत्नी अश्विनी यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला आहे.शिरोळमध्ये शाहू आघाडी, भाजप युतीशिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या दोन जागा भाजपला तर उर्वरित जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या बारा जागा आमदार यड्रावकर यांच्या शाहू आघाडीला देण्याबाबत एकमत झाले असून, त्यावर मंगळवारी शिक्कामाेर्तब दिले आहे.राधानगरीत शिंदसेनेसोबत भाजपचे मतभेदराधानगरीमध्ये शिंदसेनेसोबत भाजपचे मतभेद झाले असून, भाजप या ठिकाणी स्वतंत्र लढत देणार आहे.गगनबावड्यात शिंदेसेना, भाजप एकत्रगगनबावड्याच्या दोन्ही जिल्हा परिषद आणि चार पंचायत समितीच्या जागा काँग्रेस लढवणार असून, येथे शिंदेसेना आणि भाजप समसमान जागा लढवणार आहे.करवीरबाबत चर्चा सुरूचमहाविकास आणि महायुतीमधील करवीर तालुक्याचा पेच अजूनही मिटलेला नाही. तरीही आमदार चंद्रदीप नरके आणि भाजपमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत.
Web Summary : Kolhapur ZP elections see shifting alliances as deadlines approach. A.Y. Patil backs Congress, while Gopalrao Patil joins BJP. Factions unite in Ajra. Disagreements persist in Radhanagari and Karveer, leading to potential independent contests.
Web Summary : कोल्हापूर ZP चुनावों में समय सीमा नजदीक आने पर राजनीतिक जोड़तोड़ तेज। ए. वाई. पाटिल ने कांग्रेस का समर्थन किया, जबकि गोपालराव पाटिल भाजपा में शामिल हो गए। आजरा में गुट एकजुट। राधानगरी और करवीर में असहमति, संभावित स्वतंत्र प्रतियोगिताएँ।