शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पानसरेंची हत्या सरकारपुरस्कृत

By admin | Updated: March 6, 2015 01:18 IST

कांगो यांचा आरोप : बुधवारी मुंबईत मोर्चा; तपासावर असमाधानी

 कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांचे हल्लेखोर सापडत नसल्याने त्यांचा खून शासनपुरस्कृत असल्याचा समज केवळ ‘भाकप’चा नव्हे तर महाराष्ट्रातील सूज्ञ जनतेचा झाला आहे, असा गंभीर आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते भालचंद्र कांगो यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर, अ‍ॅड. पानसरे यांच्या खुन्यांना अटक करावी, या मागणीसाठी ११ मार्चला मुंबईत सर्व डावे पक्ष, विविध संघटनांतर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. कांगो म्हणाले, १६ फेब्रुवारीला अ‍ॅड. गोविंद पानसरे, पत्नी उमा पानसरे यांच्यावर गोळीबार झाला. दि. २० फेब्रुवारीला अ‍ॅड. पानसरे यांचा मृत्यू झाला. पानसरे यांचा खून सामाजिक, वैचारिक, राजकीय कारणांतून केला. त्यांच्या हत्येविरोधात संपूर्ण देशातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. केरळमध्ये १२५ ठिकाणी निदर्शने झाली. लातूरमध्ये सलग पंधरा दिवस मोर्चा निघाले. बिहार, झारखंड, दिल्ली, ओरिसा येथे शोकसभा झाल्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून निषेध व्यक्त करण्यात आला. आपल्या विरोधात विचार मांडणारे खुपत असल्यामुळे अतिशय नियोजनबद्धपणे हा खून केला. सरकारच्या उन्मादाचे हे द्योतक आहे. पोलीस तपास सुरू असल्याचे सांगत आहेत; परंतु प्रगती दिसत नाही. तपासांतून हाती काही मिळत नसल्यामुळे ‘भाकप’तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे कुठे जातील तेथे काळे झेंडे दाखविले जात आहेत. काळे झेंडे दाखविणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पकडून पोलिसांनी दडपशाही सुरू केली आहे. मात्र, जोपर्यंत खुनी शोधून काढत नाहीत तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणे बंद होणार नाही. तपासासंंबंधी भाष्य करताना व्यवस्था ढिसाळ झाल्याची कबुली स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिली आहे, हे अतिशय गंभीर आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि खुन्यांना त्वरित पकडावे, यासाठी भायखळा राणीच्या बागेपासून बुधवारी(दि. ११) मोर्चाला प्रारंभ होईल. ११ तारखेपर्यंत पोलिसांच्या हाती काही लागले नाही तर त्याच दिवशी बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल. सावळागोंधळ होईल पानसरेंच्या खुनाची माहिती देणाऱ्यांना शासनाने २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. मात्र, बक्षिसाच्या आमिषापोटी नको ते लोक, नको ती माहिती देऊन अपुऱ्या पोलीस यंत्रणेची दिशाभूल करून तपासांत सावळा-गोंधळ निर्माण करतात, असे मत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे आहे, असेही कांगो यांनी सांगितले.