शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘तहसील’च्या कारभाराचा पंचनामा

By admin | Updated: December 6, 2014 00:33 IST

चंदगड आमसभा : नागरिकांच्या तक्रारी; गॅस एजन्सी सुरू करणार :

चंदगड : तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत चंदगड येथील पंचायत समिती सभागृहात झालेल्या आमसभेच्या बैठकीत तहसीलदार आप्पासाहेब समिंदर यांना नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले. यावेळी तहसील कार्यालयात चाललेल्या भोंगळ कारभाराचा नागरिकांनी पंचनामा केला. सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार संध्यादेवी कुपेकर होत्या. यावेळी तालुक्यातील प्रलंबित विविध कामांचा आढावा घेण्यात आला. चार-चार महिने दुबार रेशनकार्ड, नाव कमी-जास्त करण्यासाठी दिलेली रेशनकार्ड वेळेवर मिळत नसल्याची तक्रार बाबूराव हळदणकर, मारुती कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक पाटील यांनी केली.यावेळी तहसीलदार समिंधर यांनी नाव कमी-जास्त करायला दिलेली रेशनकार्ड वेळेत मिळतील. शिवाय दुबार रेशनकार्डसाठी कागदपत्रांची सक्ती होणार नसल्याचे सांगितले. जप्त केलेली सिलिंडर परत करून उद्या, शनिवारी कवठेमहांकाळ गॅस एजन्सी सुरू करण्याची ग्वाही दिली.केरवडे पाटील वाड्यातील नळ पाणी योजनेचे काम ठेकेदाराने अर्धवट टाकून पैसे उचलल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. शेतकऱ्यांनी डांबरी रस्त्यावर पाईपलाईनसाठी चरी खोदल्या आहेत. त्यामुळे अपघात झाल्याची तक्रार चंद्रकांत शिंदे यांनी केली. या शेतकऱ्यांवर कारवाई करावी किंवा चर तरी भरून घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली. बांधकाम अभियंता व्ही. एस. घाटगे यांनी दोन दिवसांत चरी भरण्याचे आश्वासन दिले. तालुक्यातील बऱ्याच गावात डांबरी रस्ते उखडून गेले आहेत. त्याठिकाणी नवीन रस्ते तरी करावेत किंवा खड्डे भरावेत, अशी मागणी नागरिकांनी केली. ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सुहास साने हे ग्रामीण रुग्णालयात कमी व खासगी दवाखान्यात जादा वेळ राहतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.तुडये प्राथमिक आरोग्य केंद्राला १०८ रुग्णवाहिका मिळावी, अशी मागणी पांडू चव्हाण यांनी केली, तर चंदगड तालुक्यात हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. एकतर हत्तींना हुसकावून लावा, अन्यथा आम्हाला गावाबाहेर घाला, अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांनी केली. यावर वनक्षेत्रपाल सी. जी. गुजर व एस. बी. तळवडेकर यांनी हत्ती, गवे यापासून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आजपर्यंत ३८ लाखांचे धनादेश वित्ािरत करण्यात आल्याचे सांगितले.यावेळी डॉ. नंदिनी बाभूळकर, पंचायत समिती सदस्या अनुराधा पाटील, कल्लाप्पा नाईक, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पाटील, एम. जे. पाटील, आदींसह नागरिक व खातेप्रमुख उपस्थित होते. गॅस एजन्सी बंदगेल्या दोन दिवसांपासून विचारपूस न करता तालुक्यात गॅस पुरवठा करणाऱ्या कवठेमहांकाळ गॅस एजन्सीचे गोडावून नसल्याचे कारण दाखवून गॅस एजन्सीच बंद केल्यामुळे ग्राहकांत असंतोष माजला. त्याचे पडसाद आज, बुधवारच्या बैठकीत दिसले.