पंचगंगा बँकेला एक कोटी ३१ लाखांचा निव्वळ नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST2021-04-04T04:24:56+5:302021-04-04T04:24:56+5:30

कोल्हापूर : नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात येथील पंचगंगा नागरी सहकारी बँकेला एक कोटी ३१ ...

Panchganga Bank has a net profit of Rs 1.31 crore | पंचगंगा बँकेला एक कोटी ३१ लाखांचा निव्वळ नफा

पंचगंगा बँकेला एक कोटी ३१ लाखांचा निव्वळ नफा

कोल्हापूर : नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात येथील पंचगंगा नागरी सहकारी बँकेला एक कोटी ३१ लाख रुपये नफा झाला आहे. बँकेचे अध्यक्ष राजाराम शिपुगडे आणि उपाध्यक्ष राहुल भोसले यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

बँकेच्या २८० कोटींच्या ठेवी आणि १७५ कोटींची कर्जे वितरित करण्यात आली असून, नेट एनपीए ० टक्के राखण्यात बँकेला यश आले आहे.

डिजिटलायझेशनच्या युगात बँकेने ग्राहकांसाठी मोबाईल बँकिंग, ए.टी.एम., पासबुक प्रिंटर, पैसे भरण्याची यंत्रणा या सुविधा ग्राहकांंसाठी बँकेने उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्या बँकेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू असून, यानिमित्ताने सभासदांसाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

बँकेचे संचालक विकास परांजपे, चंद्रशेखर धर्माधिकारी, दिगंबर जोशी, पी. एस. कुलकर्णी, संदीप पाटील, उपेंद्र सांगवडेकर, भालचंद्र साळोखे, डॉ. माधुरी कुलकर्णी, वृषाली बंकापुरे, नंदकुमार दिवटे, विजय चव्हाण, ॲड. विवेक शुक्ल, केशव गोवेकर या संचालकांसह मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक फडणीस, महाव्यवस्थापक सुशील कुलकर्णी यांचे सहकार्य लाभल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Panchganga Bank has a net profit of Rs 1.31 crore