सर्व्हे होऊन तीन महिने उलटले, तरी कोल्हापूरमधील पूरग्रस्त व्यावसायिक, व्यापाऱ्यांना विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. तातडीने मदत देण्याबाबत राज्य शासनाने आदेश देऊनही एक विमा कंपनी विम्याची रक्कम देण्याबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याची तक्रार ...
शाहू क्लॉथ मार्केट परिसरातील कोंबडी बाजार येथे महापालिकेच्या मालकीचे ४५ गाळे आहेत. व्यापारी संकुल उभारण्यासाठी गाळे सील करण्यात आले आहेत. दोन वर्षे होत आले तरी व्यापारी संकुलही नाही आणि गाळेही सील अशी स्थिती आहे. त्यामुळे गाळे धूळ खात पडले असून, येथी ...
संपूर्ण दक्षिण आणि उत्तर भारत जोडणारा हा मुंबई ते बंगलोर राष्ट्रीय महामार्ग महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गावर किणी टोल नाका ते कोगनोळी टोल नाका हा सुमारे ४८ कि.मी. लांबीचा महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातून जातो. सध्या जिल्ह्यातील हा महामार्ग चौपदरी आह ...
दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या श्री देवी माऊली देवीच्या वार्षिक जत्रोत्सवास बुधवारी थाटात सुरुवात झाली. माऊलीच्या जयघोषात भक्तगणांनी सकाळपासून गर्दी करून श्री देवी माऊलीचे दर्शन घेतले. ...
मिरजेत गांधी चौक ते बसस्थानक या शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातात दुचाकीस्वाराचा बळी गेला. स्टेशन चौकात ड्रेनेज यंत्रणा खचल्याने लावलेल्या बॅरिकेटस्ला दुचाकी धडकून निवृत्त रेल्वे तिकीट तपासनीस पी. बी. ऊर्फ पायण्णा बाबूराव ...
कोल्हापुरच्या कलाक्षेत्राचा मानबिंदू असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या गैरसोयींची तातडीने दखल घेत गुरुवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. कलाकार व प्रेक्षकांसाठी अत्यावश्यक असलेले पिण्याचे पाणी, मेकअप रुम, स्व ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’अंतर्गत सुमारे तीन कोटी रुपयांची दिव्यांगांची साधने जूनमध्येच आली असून, केवळ केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांची तारीख मिळत नसल्याने या साधनांचे वितरण थांबले आहे. एकीकडे दिव्यांगांना या साधनांची गर ...
गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पाच शेतकऱ्यांचे सानुग्रह अनुदानाचे दावे बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंजूर केले. विषप्राशन केलेल्या दोघांचे मात्र दावे फेटाळण्यात आले. या पाचजणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३० हजार रुपये रोख व ७० हज ...
कोल्हापुरातील भाविकांनी बुधवारी कार्तिक दर्शनाचा लाभ घेतला. वर्षातून एकदा येणाऱ्या या योगावर जोतिबा रोडवरील कार्तिक स्वामी मंदिराबाहेर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. ...
कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांबाबत महापालिका प्रशासनाने कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीने नेहमी गजबजलेल्या दाभोळकर चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. ...