शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

कागलमधील १४ झोपडपट्ट्यांना सहा महिन्यांत मालकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 10:16 IST

kagal, hasan musrif, kolhapurnews, muncipalty कागल नगरपरिषदेच्या हद्दीत असणाऱ्या १४ झोपडपट्टी वसाहतींना येत्या सहा महिन्यांत मालकी हक्क मिळेल असे नियोजन करा, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महसूल यंत्रणेला दिल्या. शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी संध्याकाळी बैठक झाली.

ठळक मुद्देकागलमधील १४ झोपडपट्ट्यांना सहा महिन्यांत मालकी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्या सूचना : जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक

कोल्हापूर : कागल नगरपरिषदेच्या हद्दीत असणाऱ्या १४ झोपडपट्टी वसाहतींना येत्या सहा महिन्यांत मालकी हक्क मिळेल असे नियोजन करा, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महसूल यंत्रणेला दिल्या. शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी संध्याकाळी बैठक झाली.या झोपडपट्ट्यांचे नियमितीकरण करण्यासाठी सर्व्हेक्षण करून मोजणी करावी. ज्यांची मोजणी झालेली आहे त्यांचे प्रस्ताव नगररचना कार्यालयाकडे पाठवावेत. भूमी अभिलेख कार्यालयाने तत्काळ मोजणी करून नगररचना कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवावेत, अशी सूचना मुश्रीफ यांनी दिली.अधिकाऱ्यांनी गोरगरिबांसाठी तळमळीने वेळेत काम पूर्ण करावे. येत्या सहा महिन्यांत या झोपडपट्ट्यांचे नियमितीकरण करून त्यांचा मालकी हक्क त्यांना प्रदान करण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, कागल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, अधीक्षक भूमी अभिलेख डॉ. वसंत निकम, कनिष्ठ अभियंता सुनील माळी, महसूलच्या तहसिलदार रंजना बिचकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, नगरसेवक नितीन दिंडे, आनंदराव पसारे, सतीश घाटगे उपस्थित होते.या आहेत १४ झोपडपट्टी वसाहतीकागल नगरपरिषदेच्या हद्दीत वड्डवाडी गोसावी वसाहत, कुरणे झोपडपट्टी / जगताप वसाहत, पसारेवाडी / बिरदेव वसाहत, बिरदेव वसाहत, मडीगेट कॉर्नर, राजीव गांधी वसाहत, सांगाव नाका फुले वसाहत, मातंग वसाहत, दावणे गल्ली पिंजारी पर्डी, बेघर वसाहत, पसारेवाडी, मठुरेपर्डी, आंबेडकर वसाहत, वड्डवाडी गोसावी वसाहत अशा १४ झोपडपट्ट्या आहेत. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूरkagal-acकागलMuncipal Corporationनगर पालिका