शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
4
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
5
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
6
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
7
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
8
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
9
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
10
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
11
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
12
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
13
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
14
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
15
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
16
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
17
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
18
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
19
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
20
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा, जिल्ह्यातील दीड हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:25 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील वाणिज्य व औद्योगिक वर्गवारीतील दि. १ एप्रिल २०२० पासून एकही वीज बिल भरले नसलेल्या ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील वाणिज्य व औद्योगिक वर्गवारीतील दि. १ एप्रिल २०२० पासून एकही वीज बिल भरले नसलेल्या १ हजार ५६३ ग्राहकांकडे १५ कोटी ५२ लक्ष रुपयांची थकबाकी आहे. या ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात येणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी वीज बिल भरून सहकार्य करावे,असे महावितरणचे आवाहन आहे.

सांघिक व प्रादेशिक कार्यालयाच्या निर्देशानुसार थकबाकी वसुली मोहीम सुरू आहे. अद्यापपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील वाणिज्य वर्गवारीतील २० हजार ४४७ ग्राहकांनी २३ कोटी ५२ लक्ष रुपये तर औद्योगिक वर्गवारीतील ६ हजार ९६ ग्राहकांनी २८ कोटी ८७ लक्ष रुपये वीज बील थकबाकी भरणा केला आहे. उर्वरित ग्राहकांनी थकबाकी भरून सहकार्य करावे, अन्यथा नाईलाजास्तव वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असे महावितरण प्रशासनाने पत्रकाव्दारे कळविले आहे.