शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

साखर कामगारांसाठी आज परिषदेचे आयोजन

By admin | Updated: May 11, 2015 01:07 IST

अनेक प्रश्न प्रलंबित : आंदोलनाची दिशा ठरवणार

कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी कामगार, साखर कारखान्यांचे कामगार व ऊस वाहतूकदार यांच्या विविध प्रश्नांबाबत आगामी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज, सोमवारी कोल्हापुरात राज्यस्तरीय परिषद होत आहे. राज्य शासनाने ऊसतोडणी कामगारांना तोडणीदरात वाढीची घोषणा केली; पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. साखर कामगारांची देणी अशा अनेक प्रश्नांबाबत या परिषदेत जोरदार चर्चा होणार आहे. ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीवाढीच्या कराराची मुदत संपून वर्ष झाले. संपलेल्या हंगामात शासनाने केवळ चर्चेचे गुऱ्हाळ घातले. शेवटच्या क्षणी वाढ केली; पण त्याची अंमलबजावणीही केलेली नाही. वाढती महागाई पाहता ऊसतोड कामगारांना पोट भरणे मुश्कील झाले आहे. त्याचबरोबर एफ. आर. पी.प्रमाणे पैसे दिले नसल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये कारखान्यांकडे थकीत आहेत. परिणामी शेतकरी अडचणीत आला आहे. कारखान्यांचा गळीत हंगाम संपून दोन महिने होत आले तरी पैसे दिलेले नाहीत. साखर कामगारांच्या वेतनाचा प्रश्नही आहे. या सर्व प्रश्नांबाबत अनेक वेळा शासकीय पातळीवर चर्चा केली. आंदोलन केले, मोेर्चे काढले; पण शासनाने फारशी दखल घेतलेली नाही. हा हंगाम तसाच गेला. किमान आगामी हंगामाबाबत तरी ठोस निर्णय घेण्यासाठी राज्यस्तरीय परिषदेचे कोल्हापुरात आयोजन केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी-वाहतूक कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी दिली. या परिषदेचे उद्घाटन ‘सिटू’चे राज्य सचिव डॉ. डी. एल. कराड यांच्या हस्ते व उद्धव भवलकर यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. यावेळी डॉ. अजित नवले, अण्णा सावंत यांच्यासह ऊसतोडणी कामगार, राज्य साखर कामगार, ऊस वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत ठराव केले जाणारच; पण आगामी आंदोलनाचे रणशिंगही फुंकले जाणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)