शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आदेश कागदावर, तंबाखू हातावर

By admin | Updated: March 11, 2015 00:31 IST

खुलेआम विक्री सुरूच : बंदीचे आदेश अद्याप मुख्याध्यापक, प्राचार्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत

संदीप खवळे - कोल्हापूर -शैक्षणिक संस्थांपासून शंभर मीटर अंतराच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत; पण याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने काढलेले परिपत्रक अद्याप शिक्षण अधिकारी स्तरावरच आहे. हे परिपत्रक प्राथमिक, माध्यमिकचे मुख्याध्यापक तसेच उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांना मिळालेले नाही; त्यामुळे शहरातील ज्ञानमंदिरांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री सुरू आहे. ७ मार्च २०१५ रोजी शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यासंदर्भात शैक्षणिक संस्थांसाठी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकातील आदेशानुसार शैक्षणिक संस्थांच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरील बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या परिसरात विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे. दंडाची रक्कम दोनशे रुपये आहे; पण परिपत्रक निघून त्यावरील अनुपालन अहवाल देण्याची वेळ संपली तरी शहरात कुठेच कारवाई करण्यात आलेली नाही. सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध अधिनियम, २००३ मधील कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे, तर कलम सहा - ब नुसार शैक्षणिक संस्थांपासून १०० मीटर अंतरावर तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी आहे. या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्यास दोनशे रुपयांची दंडात्मक तरतूद आहे; पण आज खुलेआम शैक्षणिक आवारात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जाते. नवीन परिपत्रकांनुसार आता शाळा-हायस्कूलचे मुख्याध्यापक, महाविद्यालयांचे प्राचार्य यांना शैक्षणिक संस्था परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. वस्तुत: ही तरतूद सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध अधिनियम, २००३ मध्ये पूर्वीपासूनच आहे. शालेय परिसरात गुटखा आणि मावा विक्रेत्यांची वाढती संख्या पाहून शासनाने कारवाईची जबाबदारी आता गुरुजनांवर सोपविली आहे; पण दंडाची रक्कम कुणी वसूल करायची, ती कुणाकडे जमा करायची, याचे स्वरूप शिक्षण खात्याला माहीत नाही. अन्न आणि औषध प्रशासनानुसार जिल्ह्यात १५४५ पानटपऱ्या सर्रास सर्वच पानटपऱ्यांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जाते. यामध्ये प्रामुख्याने तंबाखू, पानमसाला, मावा यांचा समावेश आहे.अन्न आणि औषध प्रशासनाच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथील कार्यालयापासून पंचवीस मीटर अंतरावरच खुलेआम तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते.नवीन परिपत्रकांनुसार आता मुख्याध्यापक, महाविद्यालयांचे प्राचार्य यांना शैक्षणिक संस्था परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकारशैक्षणिक संस्थांपासून शंभर मीटर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास मनाई आहे. या परिसरात त्यांची विक्री करणाऱ्यांवर दोनशे रुपयांच्या दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. एप्रिल २०१४ ते जानेवारी २०१५ पर्यंत या प्रकरणी २९ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. - एस. एम. देशमुख, सहायक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन