विरोधी आघाडीची आज बैठक शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:23 IST2021-03-21T04:23:10+5:302021-03-21T04:23:10+5:30

कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.२१ ) विरोधी आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. खासदार संजय मंडलिक ...

Opposition meeting possible today | विरोधी आघाडीची आज बैठक शक्य

विरोधी आघाडीची आज बैठक शक्य

कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.२१ ) विरोधी आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने शनिवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाल्याने हालचाली गतिमान झाल्या आहेत.

‘गोकुळ’च्या विरोधी आघाडीची बांधणी जवळपास पूर्ण झाली आहे. विद्यमान सहा संचालकांनी सत्तारूढ गटापासून फारकत घेतली आहे. त्यांच्यासमवेत विरोधी आघाडीची घोषणा केली जाणार आहे. मात्र खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने हे संसदेचे अधिवेशन असल्याने दिल्लीत होते. ते शनिवारी रात्री कोल्हापुरात आले. त्यामुळे विराेधी आघाडीच्या नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता आहे. दोन खासदारांसह ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबीटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजीत पाटील-सरूडकर आदींची बैठक होऊन आघाडीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Web Title: Opposition meeting possible today