शिरदवाडमध्ये युवकांना सदस्यपदाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:22 IST2021-01-21T04:22:06+5:302021-01-21T04:22:06+5:30
२००१२०२१-आयसीएच-०३ (अर्जुन कांबळे) लोकमत न्यूज नेटवर्क अब्दुललाट : शिरदवाड (ता. शिरोळ) गावामध्ये शांतता नांदावी, तरुणांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून ...

शिरदवाडमध्ये युवकांना सदस्यपदाची संधी
२००१२०२१-आयसीएच-०३ (अर्जुन कांबळे)
लोकमत न्यूज नेटवर्क अब्दुललाट : शिरदवाड (ता. शिरोळ) गावामध्ये शांतता नांदावी, तरुणांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आणि शंभर टक्के गावच्या विकासाचे राजकारण करणे यावर भर देणार असल्याचे मत येथील बहुजन वंचित आघाडीचे नूतन सदस्य अर्जुन एकनाथ कांबळे (वय २२) यांनी व्यक्त केले.
अर्जुन हे सध्या इचलकरंजी येथील डीकेएएससी कॉलेजमध्ये बी.ए.च्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहेत. आई-वडील शेतमजूर आहेत. गावातील विकासकामांसाठी त्यांनी उमेदवारीचा अर्ज भरला. त्यांच्या समर्थकांनी एकीची व्रजमूठ करून त्यांना निवडून आणले. गावात वाचनालय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी कार्यशाळेचे आयोजन करणार असल्याचे अर्जुन कांबळे यांनी सांगितले.
(फोटो)
२००१२०२१-आयसीएच-०४ (महादेव कुंभार) शिरदवाड गावात आरोग्यसेवा दर्जेदार करणे, गावतलावाचे सुशोभीकरण, स्वच्छ आणि मुबलक पाणी देणे, लिंगायत समाजासाठी समाज मंदिर बांधणे यावर भर देणार आहे, असे मत महादेव भूपाल कुंभार (वय २५) यांनी व्यक्त केले.
महादेव यांचे शिक्षण एम. कॉम. झाले आहे. गत पाच वर्षांत शासनाकडून गावास बराच निधी आला; पण गावातील राजकारणामुळे तो शासनाला जमा झाला. यामुळे महादेव यांनी समविचारी तरुणांना एकत्र करून या परिस्थितीला तोंड देण्यासाठी निवडणूक लढवली, त्यात ते विजयी झाले. गावातील तरुणांना स्वयंरोजगाराच्या वाटा मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.