शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

केवळ एकाच संघटनेचा बोनस गुणासाठी प्रस्ताव

By admin | Updated: May 28, 2015 00:56 IST

कोल्हापुरातील स्थिती : खेळाडूंना फटका

कोपार्डे : माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे २५ गुण केवळ उत्तीर्ण होण्यासाठी देण्याची तरतूद आहे. कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे किमान ५०० ते ६०० खेळाडू विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा देत आहेत. राज्य क्रीडा परिषद अंतर्गत मान्यताप्राप्त ५२ क्रीडा संघटनांपैकी केवळ एकाच संघटनेने क्रीडा सवलतीच्या गुणासाठी प्रस्ताव पाठविल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे इतर खेळातील खेळाडू विद्यार्थ्यांना या सवलत गुणांचा लाभ होणार नसल्याने अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.२०१४-१५ करिता सवलतीचे क्रीडा गुण मिळण्याबाबतचे प्रस्ताव मार्च २०१५ पर्यंत पाठविणेबाबत विभागीय शिक्षण मंडळांनी संबंधित शाळा, संस्था यांना कळवले होते. यामध्ये ६२ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे, तर ९ ग्रामीण क्रीडा स्पर्धा व १२ महिला क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. संबंधित राज्य संघटनांना संचालनालयास व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना शासन निर्णयानुसार सादर करावयाच्या कागदपत्राबाबत कळविण्यात आले होते. मात्र, या ५२ पैकी केवळ एका संघटनेने आपल्या खेळाडूंच्या सवलतीच्या गुणासाठी (बोनस गुणासाठी) प्रस्ताव दाखल केला आहे. महाराष्ट्र हॅण्डबॉल असोसिएशन या संघटनेने ८ खेळाडूंचे बोनस गुणासाठी प्रस्ताव दाखल केले आहे. जिल्ह्यात विविध खेळात ५०० ते ६०० खेळाडू आहेत. ते या संघटनांशी संलग्न असून, खेळासाठी अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्याने या खेळाडूंना शासनाच्या निर्णयानुसार दिल्या जाणाऱ्या बोनस गुणांची गरज निश्चित आहे. पण शासनाने दिलेल्या या सवलतींचा फायदा या खेळाडूंना देण्यास या संघटना अपयशी ठरल्याची माहिती जिल्हा क्रीडा विभागाकडून प्राप्त झाली आहे.माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील परीक्षेत जे खेळाडू विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार आहेत, त्या विद्यार्थी खेळाडूंना शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे उत्तीर्ण होण्याची संधी मिळते. मात्र, या संघटना प्रस्ताव दाखल करत नसल्याने तोटा होतो. यासाठी शिक्षक, पालक व खेळाडू विद्यार्थ्यांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. - नवनाथ फडतारे, क्रीडाधिकारी, कोल्हापूर