शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

लढा दिला तरच हक्क मिळेल

By admin | Updated: August 3, 2014 01:47 IST

रंजना निरुला : सिटू ,आशा व गटप्रवर्तक यांचे पहिल्या राज्य अधिवेशनाचे उद्घाटन

कोल्हापूर : देशातील इतर राज्यांत ‘आशा’ वर्कर्सना राज्य सरकार मासिक मानधन देते. पण, महाराष्ट्रातील काँग्रेस आघाडीचे सरकार मासिक मानधन देण्यास उदासीनता दर्शवित आहे. त्यासाठी ‘आशां’नी लढा द्यावा, तरच तुम्हाला हक्क मिळेल, असे मत दिल्लीच्या आशा व गटप्रवर्तक राष्ट्रीय समन्वयक रंजना निरुला यांनी आज, शनिवारी व्यक्त केले. सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू), आशा व गटप्रवर्तक यांच्या पहिल्या राज्य अधिवेशनात कोल्हापुरातील रुईकर कॉलनीतील एका हॉलमध्ये झालेल्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. राज्य समन्वयक विजय गाभणे अध्यक्षस्थानी होते. यावेळी जनवादी महिला संघटनेच्या राज्य अध्यक्ष मरियम ढवळे, ‘आशां’च्या समस्यांविषयक अभ्यासक कविता भाटिया (ठाणे) आदींची उपस्थिती होती. उद्या, रविवारी या अधिवेशनाचा समारोप होणार आहे. रंजना निरुला म्हणाल्या, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ‘आशां’ना योग्य मानधन दिले जात नाही. काही राज्यांत ‘आशां’नी लढे दिल्यामुळेच त्याला यश आले. पश्चिम बंगालमध्ये १३००, केरळमध्ये एक हजार, राजस्थानमध्ये ११००, हरयाणात ५००, तर कर्नाटकात सर्वाधिक २२०० रुपये मासिक मानधन तेथील सरकार देते. देशभरातील सर्व ‘आशां’ना मासिक किमान सात हजार रुपये मिळावेत, अशी मागणी आहे. आरोग्य खात्यात होणाऱ्या खर्चाची अपुरी तरतूद, अपुरे कर्मचारी व मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे आशांना काम करण्यात अडचणी येत आहेत. आपण लढा दिला तरच हा प्रश्न सुटेल. मात्र, ‘आशां’ना जेवढे मानधन मिळेल तेवढाच प्रोत्साहन भत्ता मिळेल, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. सध्या महाराष्ट्रात सुमारे ६२ हजार, तर जिल्ह्यात २८०० ‘आशा’ आहेत. मरियम ढवळे म्हणाल्या, दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यांना मान-सन्मान मिळाला पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने महिलांविषयक कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यावेळी स्वागत डॉ. माया पंडित-नेरकर यांनी केले. अधिवेशनात सिटूचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य प्रा. डॉ. सुभाष जाधव यांचे भाषण झाले. विजयाराणी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जिल्हा सेक्रेटरी सुभाष निकम, ‘सिटू’चे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, प्राचार्य ए. बी. पाटील, शिवाजी मगदूम, आनंदराव चव्हाण यांच्यासह आशा, गटप्रवर्तक उपस्थित होते. कविता अमिनगावी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)