शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाशी लढणारे सीपीआरमधील कर्मचारीच लसीकरणात मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST

समीर देशपांडे : लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाच्या काळामध्ये जिवावर उदार होऊन पाॅझिटिव्ह रुग्णांना ...

समीर देशपांडे : लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाच्या काळामध्ये जिवावर उदार होऊन पाॅझिटिव्ह रुग्णांना बरे करणारे येथील सीपीआर रुग्णालयातील कर्मचारीच लस घेण्यामध्ये मात्र जिल्ह्यात सर्वांत मागे आहेत. ग्रामीण जिल्ह्यामध्ये सरासरी ६१ टक्के लसीकरण झाले असताना सीपीआरमध्ये मात्र केवळ २१ टक्के लसीकरण झाले आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून ११ आरोग्य संस्थांच्या ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात आले. यानंतर आणखी ८ आरोग्य संस्थांमध्ये लसीकरणाची सोय करण्यात आली आणि आता त्यानुसार नवे नियोजन करण्यात आले आहे.

चौकट

कोल्हापूर जिल्हा लसीकरण एकूण उद्दिष्ट ३३८७७

आतापर्यंत ७ फेऱ्यांमधील उद्दिष्ट ९५००

आतापर्यंत ७ फेऱ्यांमधील लसीकरण ५७९०

यातील महापालिकेचे लसीकरण २५७६

जिल्ह्यातील लसीकरण ३२१४

आतापर्यंत लसीकरण झालेली टक्केवारी ६१ टक्के

चौकट

सीपीआरमध्ये सर्वांत कमी लसीकरण

सीपीआरचे होते उद्दिष्ट ७००

आतापर्यंत लस घेतलेले १४६

लस घेतलेल्यांची टक्केवारी २१ टक्के

कोट

१ मला गेले काही दिवस कमी प्रमाणात ताप जाणवत होता. त्यामुळे मी आतापर्यंत लस घेतलेली नाही. मात्र, एकदा का ताप कमी झाला की मी लस घेणार आहे.

जि. प.कडील वैद्यकीय अधिकारी

२ मला चार ड्रग्जची ॲलर्जी आहे. त्यामुळे मी याबाबत वरिष्ठांना कल्पना दिली आहे. त्यांनीही दुसऱ्या टप्प्यात लस टोचून घेण्याची सूचना केली आहे.

बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, हातकणंगले

३ मला २५ जानेवारी रोजी लस घेण्यासाठी विभागाकडून संदेश आला होता; परंतु सकाळी मला कणकण आल्याने मी लस घेतलेली नाही. पुढील आठवड्यात लस घेणार आहे.

आशा कर्मचारी, करवीर तालुका

४ माझ्या वरिष्ठ डॉक्टरांनीही लस घेतली आहे; परंतु माझी मुळातच तब्येत अशक्त असल्याने मला लस घेण्यासाठी भीती वाटत आहे.

परिचारिका, शिरोळ तालुका

५ सध्या सुरू असलेल्या लसीकरणाचा दुसरा टप्पा संपल्यानंतर २८ दिवसांनी मी लस टोचून घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतीत दक्षता घेऊन, थोडे थांबून लस घेणार आहे.

आरोग्य कर्मचारी, सीपीआर कोल्हापूर

कोट

जिल्ह्यामध्ये लसीकरणाचे काम चांगल्या पद्धतीने चालले आहे. काही ठिकाणी संख्या कमी आहे. मात्र, ज्या ठिकाणी लसीकरण कमी झाले आहे, त्या ठिकाणी समुपदेशन सुरू आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच आधी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर