- संतोष भोसले किणी - पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील घुणकी येथील ओढ्याच्या पुलाजवळ कांद्याची वाहतूक करणार ट्रक पहाटेच्या वेळी रस्त्याच्या मध्यभागी उलटल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. तर ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की महामार्गावरील घुणकी येथील ओढ्याच्या पुलावर कोल्हापूरच्या दिशेने कांदा घेऊन येणार ट्रक रस्त्याच्या मध्यभागीच उलटुन कांद्याची पोती रस्त्यावर पडल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन वाहतूक कोंडी झाली व रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या पाच किलोमीटर हुन अधिक रांगा लागल्या होत्या. मुंबई पुणे हुन पहाटे पोहोचणारी वाहनातील प्रवासी अडकून पडले होते. व महामार्ग पोलिस मदत कक्षाच्या हायवे हेल्पलाईनच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या साह्याने ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वाहतूक वळविण्यात आली आहे याठिकाणी रस्ता अरुंद असल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे.
Web Summary : An onion truck overturned on the Pune-Bangalore highway near Ghunki, causing a traffic jam. The accident occurred early morning, blocking the road and creating long queues. Highway police cleared the truck, restoring traffic flow. Construction narrows the road, causing congestion.
Web Summary : पुणे-बेंगलुरु राजमार्ग पर घुणकी के पास प्याज से भरा एक ट्रक पलटने से यातायात बाधित हो गया। दुर्घटना सुबह हुई, जिससे सड़क अवरुद्ध हो गई और लंबी कतारें लग गईं। राजमार्ग पुलिस ने ट्रक को हटाकर यातायात बहाल कर दिया। निर्माण के कारण सड़क संकरी है, जिससे भीड़भाड़ हो रही है।