शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

एक बंद, दोन सिग्नल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: February 23, 2015 23:59 IST

अपघाताचे वाढते प्रमाण : संभाजीनगर चौक, क्रशर चौक, हॉकी स्टेडियम चौकात वाहतुकीचा बोजवारा

अमर पाटील-कळंबा -वाहनांच्या वाढत्या संख्येने उद्भवणारी रहदारीची समस्या व अपघातांचे वाढते प्रमाण गांभीर्याने घेऊन उपनगरात तीन ठिकाणी वाहतूक नियंत्रक सिग्नल व्यवस्था बसविण्यात आली. संभाजीनगर पेट्रोल पंपासमोरील सिग्नल नव्याचे नऊ दिवसांप्रमाणे कार्यान्वित राहिले, तर क्रशर चौकात व हॉकी स्टेडियम चौकात स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग पट्ट्यांअभावी असणारे सिग्नल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. सिग्नल तीन मात्र वाहतुकीच्या शिस्तीचे तीन तेरा वाजले आहेत.संभाजीनगर चौक, क्रशर चौक, हॉकी स्टेडियम चौक हे शहरालगत असणाऱ्या सर्व उपनगरांना व ग्रामीण भागांना जोडणारे मुख्य रस्ते आहेत. या चौकात सिग्नल असूनही वाहतुकीचा बोजवारा नित्याचा आहे. एकाचवेळी कळंबा, गारगोटी मार्गे येणाऱ्या वाहनांनी संभाजीनगर चौक, राधानगरी फुलेवाडी मार्गे येणाऱ्या वाहनांनी क्रशर चौक, सायबर मार्गे येणाऱ्या अवजड वाहनांनी हॉकी स्टेडियम चौकात गर्दी होते. त्यामुळे येथे अपघात होतात.या सर्व परिसरात शाळा, हॉस्पिटल, मंगल कार्यालये, हॉटेल्स, आयटीआय, कळंबा जेल, बॅँका असल्याने भरधाव वाहनधारकांवर चाप बसवण्यासाठी स्पीड ब्रेकर करणे आवश्यक आहे. पदपथ किरकोळ विक्रेत्यांनी व्यापल्याने हमरस्त्यावरून जीव मुठीत घेऊन जावे लागते. रस्त्यावर असणाऱ्या वडापच्या गाड्या , पिकअप शेडअभावी उभे असलेले प्रवासी यामुळे समस्या गंभीर होत आहे. वाहतुकीची समस्याएकाचवेळी चार मुख्य मार्गांवरून येणाऱ्या वाहनांनी वाहतूक ठप्पस्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग पट्ट्यांअभावी अपघातात वाढगर्दीच्या वेळी वाहतूक नियंत्रकाअभावी शिस्त कोलमडलेलीपदपथावरील विक्रेते, पिकअपशेडअभावी प्रवासी यामुळे खोळंबाउपाय गरजेचेकिमान गर्दीच्यावेळी सिग्नल कार्यान्वित, वाहतूक नियंत्रक आवश्यकयोग्य अंतरावर, योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकर करणेझेब्रा क्रॉसिंगपट्टे आवश्यकपदपथावरील विक्रेते अन्यत्र हलवावेतचौकात प्रवासी पिकअपशेडची गरज सिग्नलमध्ये नियमितता हवी