अंबवडे हद्दीत कंटेनर व ॲम्ब्युलन्सच्या अपघातात एक ठार, तर सहाजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:24 AM2021-03-25T04:24:48+5:302021-03-25T04:24:48+5:30

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोंडअसुर्डे ता. संगमेश्वर येथील महिला योगीता यशवंत चव्हाण या मेंदुविकाराने त्रस्त झाल्यामुळे कोल्हापूर येथून उपचार घेऊन ...

One killed, six injured in container and ambulance accident in Ambawade area | अंबवडे हद्दीत कंटेनर व ॲम्ब्युलन्सच्या अपघातात एक ठार, तर सहाजण जखमी

अंबवडे हद्दीत कंटेनर व ॲम्ब्युलन्सच्या अपघातात एक ठार, तर सहाजण जखमी

Next

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोंडअसुर्डे ता. संगमेश्वर येथील महिला योगीता यशवंत चव्हाण या मेंदुविकाराने त्रस्त झाल्यामुळे कोल्हापूर येथून उपचार घेऊन आपल्या कोंडअसुर्डे या गावी निघाल्या होत्या. सोबत त्यांचे दोन बंधू व नातेवाईक होते. अंबवडे हद्दीत एका वळणावर रत्नागिरीकडून कोल्हापूरकडे येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिल्याने रश्मी राजेंद्र चव्हाण या जागीच मृत झाल्या, तर सहाजण गंभीर जखमी झाले. बांबरवाडी येथील अमर अशोक दीपक, रुग्णवाहिका चालक नामादेव तुकाराम माळवी (रा.शिंगणापूर), पांडुरंग रघुनाथ टाकळे (रा. कोल्हापूर), यशवंत दिनकर चव्हाण, वैशाली श्रीकांत चव्हाण (सर्व राहणार कोंडअसुर्डे, ता. संगमेश्वर) व कंटेनर चालक संतोष भीमाण्णा कोळी (रा. डफळापूर, ता. जत) हे सर्वजण गंभीर जखमी झाले असून यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे तपास अधिकारी, पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. डी. फडतरे यांनी सांगितले.

Web Title: One killed, six injured in container and ambulance accident in Ambawade area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.